देशात करोनाचा प्रादुर्भाव दिवसागणिक वाढतच चालला आहे. करोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी लॉकडाउन आणि सोशल डिस्टसिंगसारखे उपाय केले जात आहेत. या लॉकडाउनच्या काळात अनेकांच्या नोकऱ्या गेल्या. शिवाय अनेक मोठ्या कंपन्यांना आर्थिक संकटांचा सामना करावा लागत आहे. काहींनी तर आत्महत्या करुन प्रश्न सोडवला. कुणाचं काम बंद, कुणाचे पगार कापले, कुणाची नोकरी गेली. या कठीण परिस्थितीत रोजंदारी करणारे मजूर आणि हातावर पोट असणारे कित्येकजण भूकेनं व्याकूळ आहेत. त्यांच्या दोन वेळच्या जेवणासाठी आहे. अशातही काहींनी आपली जिद्द सोडली नाही… अशाच पुण्यातील एक आजी सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

पुण्यातील शांता बाळू पवार या ८५ वर्षीय आजींचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. या आजी पोट भरण्यासाठी रस्त्यावर काठ्यांचा खेळ करत कसरत करत आहेत. अभिनेता रितेश देशमुखने हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. ८५ वर्षीय शांता बाळू पवार रस्त्यावर लाठीकाठी खेळताना या व्हायरल व्हिडीओत दिसत आहे. आपलं कौशल्य सादर करत त्या पोट भरण्याचा प्रयत्न करत आहे. रितेश देशमुखनं या वृद्ध महिलेला वॉरिअर आजी (Warrior Aaji) असं म्हटलं आहे.

 

View this post on Instagram

 

Warrior Aaji

A post shared by Riteish Deshmukh (@riteishd) on

रितेश देशमुखनं व्हिडीओ शेअर करत या आजी कोण आहेत? समजू शकेल का? त्यांना मदत करण्याची इच्छा आहे असं म्हटलं होतं. त्याला लोकांनी प्रतिसाद देत त्या महिलेचा शोध घेतला आहे. शांता पवार या आजी हडपसर येथील बौद्ध विहार येथे वास्तव्यास आहेत. त्यांची घरची परिस्थिती हालाकीची आहे. दोन वेळच्या जेवणाचेही वांदे आहेत. त्यामुळे वृद्धापकाळातही त्या रस्त्यावर लाठीकाठीचा खेळ करुन आपलं पोट भरत आहेत.