व्यवसायिक आणि अभिनेत्री शिल्पा शेट्टीचे पती राज कुंद्रा यांना मुंबई पोलिसांनी सोमवारी रात्री अश्लील चित्रपट निर्मितीच्या आरोपांखाली अटक केली. मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने ही कारवाई केली आहे. फेब्रुवारीमध्ये मढ परिसरातील एका बंगल्यावर टाकलेल्या छाप्यात अश्लील चित्रपट बनविणाऱ्या टोळीला अटक करण्यात आली होती. या गुन्हामध्ये कुंद्रा प्रमुख आरोपी असून त्यांच्याविरोधात पुरेसे पुरावे असल्याने अटक करण्यात आल्याचं पोलिसांनी सांगितलं. राज कुंद्रा यांना सोमवारी रात्री अचानक अटक झाल्याचे वृत्त समोर आल्यानंतर सोशल नेटवर्किंगवर याचसंदर्भातील चर्चा पहायला मिळाली. अवघ्या काही मिनिटांमध्ये राज कुंद्रा, शिल्पा शेट्टी यांचं नाव ट्विटरच्या टॉप ट्रेण्डमध्ये दिसू लागली. मात्र त्याच वेळेस गुगलवरही कुंद्रा यांच्यासंदर्भातील सर्च वाढल्याचं दिसून आलं. विशेष म्हणजे Movies Made By Raj Kundra हा सर्च करण्यामध्ये महाराष्ट्र हा देशात आघाडीवर असल्याचं चित्र गुगल ट्रेण्ड्समध्ये दिसून आलं.

नक्की पाहा >> कंडक्टरचा मुलगा, हिरे व्यापारी, शिल्पा शेट्टीशी लग्न ते पॉर्न प्रकरण; राज कुंद्रांबद्दलच्या ३० खास गोष्टी

jitendra awad challenge to ajit pawar
“अजित पवारांच्या डोक्यातलं विष बाहेर आलं”, ‘द्रौपदी’वरच्या विधानावरुन जितेंद्र आव्हाडांची टीका
hemant patil
भाजपहट्टापुढे शिंदेसेना हतबल; हिंगोली, यवतमाळचे उमेदवार बदलण्याची नामुष्की
loksatta analysis india fights somali pirates indian navy rescues ship from somali pirate attack
विश्लेषण: हुथींपाठोपाठ आता सोमाली चाच्यांचा उच्छाद… भारतीय नौदलाची भूमिका कशी ठरणार निर्णायक?
Sharmila Pawar
अजित पवारांच्या सख्ख्या वहिनी आता सुप्रिया सुळेंच्या प्रचारात; म्हणाल्या, “आपल्या माहेरवाशिणीला…”

गुगल ट्रेण्डमधील आकडेवारीसंदर्भात बोलायचं झाल्यास पॉर्न फिल्मप्रकरणी राज कुंद्रा यांना अटक केल्याची बातमी सोमवारी रात्री साडेअकराच्या सुमारास समोर आल्यानंतर काही तासांमध्येच राज कुंद्रा यांनी बनवलेले चित्रपट कोणते आहेत हे पाहण्यासाठी नेटकऱ्यांनी गुगलकडे धाव घेतली. त्यामुळेच महाराष्ट्र, गुजरात, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश आणि तामिळनाडूमध्ये Movies Made By Raj Kundra या टर्मबद्दलचा सर्च वाढल्याचं दिसून आलं. इतकचं नाही तर यामध्ये महाराष्ट्र आघाडीवर असल्याचंही गुगल ट्रेण्डमध्ये दिसत आहे. राज कुंद्रा न्यूज हा सुद्धा या सर्चसंदर्भातील रिलेटेड सर्च होता.

नक्की वाचा >> “Porn Vs Prostitution वर बोलूयात, कॅमेरासमोरच्या सेक्ससाठी…”; राज कुंद्रांचं ‘ते’ ट्विट व्हायरल

तसेच Raj Kundra यासंदर्भातील सर्च सर्वच राज्यांमध्ये वाढल्याचं चित्र दिसून आलं. प्रामुख्याने दिल्ली, महाराष्ट्र, गोवा, हरियाणा आणि कर्नाटकमध्ये राज कुंद्रांसंदर्भात सर्वाधिक प्रमाणात सर्च झाल्याचं गुगल ट्रेण्डच्या आकडेवारीवरुन स्पष्ट होत आहे.

राज कुंद्रांची सोशल नेटवर्किंगवरही फार चर्चा असल्याचं चित्र दिसून आलं. राज कुंद्रांचं एक जुनं ट्विटही त्यांच्या व्हायरल झालं. ९ मार्च २०१२ रोजी ब्लॅकबेरी फोनवरुन करण्यात आलेल्या या ट्विटमध्ये राज यांनी पॉर्न विरुद्ध देहविक्री म्हणजेच प्रॉस्टीट्यूशनबद्दल दोन प्रश्न उपस्थित केले होते.

नक्की वाचा >> राज कुंद्रा गुन्हेगारी प्रकरणांची यादी : इक्बाल मिर्ची, बिटकॉईन घोटाळा, IPL सट्टेबाजी ते Porn App प्रकरण…

“पॉर्न विरुद्ध प्रॉस्टीट्यूशनवर बोलूयात. कॅमेरासमोरच्या सेक्ससाठी (कॅमेराच्या माध्यमातून शूट केलेल्या पॉर्न फिल्मसाठी) पैसे देण्याला कायदेशीर मान्यता का देण्यात आलीय? हे दुसऱ्यापासून (प्रॉस्टीट्यूशनपासून) वेगळं कसं ठरतं?”, असा उल्लेख या ट्विटमध्ये आहे. सध्या अनेक अकाऊंटवरुन या जुन्या ट्विटचा स्क्रीनशॉर्ट व्हायरल झाल्याचं चित्र दिसत आहे. तर आता राज कुंद्रा मुंबई पोलिसांसोबत या विषयावर चर्चा करतील, असं म्हणत द देशभक्त नावाच्या एका ट्विटर हॅण्डलवरुन हा स्क्रीनशॉर्ट शेअर करण्यात आलाय.