अश्लील चित्रपट निर्मितीच्या आरोपांखाली व्यवसायिक आणि अभिनेत्री शिल्पा शेट्टीचे पती राज कुंद्रा यांना सोमवारी रात्री उशीरा मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने अटक केली. फेब्रुवारीमध्ये गुन्हे शाखेने मढ परिसरातील एका बंगल्यावर छापा घालून अश्लील चित्रपट बनविणाऱ्या टोळीला अटक केलेली. हे चित्रपट विविध समाजमाध्यमांद्वारे प्रदर्शित केले जात होते. या गुन्ह्यामध्ये कुंद्रा मुख्य आरोपी असून त्यांच्याविरोधात पुरेसे पुरावे असल्याचा दावा मुंबई पोलिसांनी केलाय. या प्रकरणामध्ये मुंबई पोलिसांनी फेब्रुवारीमध्येच गुन्हा नोंदवला आहे. राज कुंद्रा या प्रकरणात मुख्य आरोपी असल्याचे दिसत असून त्यास अटक करण्यात आली आहे. पुढील तपास सुरु आहे, असं मुंबई पोलीस आयुक्तांनी निवेदनाद्वारे स्पष्ट केले. राज कुंद्रा यांना सोमवारी रात्री अचानक अटक झाल्याचे वृत्त समोर आल्यानंतर सोशल नेटवर्किंगवर याचसंदर्भातील चर्चा पहायला मिळाली. अवघ्या काही मिनिटांमध्ये राज कुंद्रा, शिल्पा शेट्टी यांचं नाव ट्विटरच्या टॉप ट्रेण्डमध्ये दिसू लागली. असं असतानाच राज कुंद्रांचं एक जुनं ट्विटही व्हायरल झाल्याचं पहायला मिळालं.

नक्की पाहा >> कंडक्टरचा मुलगा, हिरे व्यापारी, शिल्पा शेट्टीशी लग्न ते पॉर्न प्रकरण; राज कुंद्रांबद्दलच्या ३० खास गोष्टी

Accused who absconded after killing arrested after 34 years
हत्या करून फरार झालेल्या आरोपीला ३४ वर्षांनी अटक; गुन्हे शाखा १ ची कारवाई
Over 150000 Complaints , Online Pornography, national cyber crime portal, 3 Years, 150 Cases fir Registere, police, rti data, crime news, Pornography news, Pornography in india, Porn sites, Porn share, mumbai, pune, maharashtra, west bangal,
अश्लील चित्रफितींबाबत तीन वर्षांत दीड लाखांवर तक्रारी
Israel use of AI in war revealed in reports by Israeli and Palestinian journalists
इस्रायलकडून युद्धात ‘एआय’चा वापर? इस्रायली आणि पॅलेस्टिनी पत्रकारांच्या अहवालात खुलासा
youth murder
वसई : अपघात नव्हे ही तर हत्या, ३ वर्षांनी हत्येला फुटली वाचा

व्हायरल झालेलं ट्विट हे राज कुंद्रा यांनी २०१२ साली केल्याचं स्क्रीनशॉर्टमधून दिसून येत आहे. २९ मार्च २०१२ रोजी ब्लॅकबेरी फोनवरुन करण्यात आलेल्या या ट्विटमध्ये राज यांनी पॉर्न विरुद्ध देहविक्री म्हणजेच प्रॉस्टीट्यूशनबद्दल दोन प्रश्न उपस्थित केले होते. “पॉर्न विरुद्ध प्रॉस्टीट्यूशनवर बोलूयात. कॅमेरासमोरच्या सेक्ससाठी (कॅमेराच्या माध्यमातून शूट केलेल्या पॉर्न फिल्मसाठी) पैसे देण्याला कायदेशीर मान्यता का देण्यात आलीय? हे दुसऱ्यापासून (प्रॉस्टीट्यूशनपासून) वेगळं कसं ठरतं?”, असा उल्लेख या ट्विटमध्ये आहे.

Raj Kundra Tweet

सध्या अनेक अकाऊंटवरुन या जुन्या ट्विटचा स्क्रीनशॉर्ट व्हायरल झाल्याचं चित्र दिसत आहे. तर आता राज कुंद्रा मुंबई पोलिसांसोबत या विषयावर चर्चा करतील, असं म्हणत द देशभक्त नावाच्या एका ट्विटर हॅण्डलवरुन हा स्क्रीनशॉर्ट शेअर करण्यात आलाय.

नक्की काय आहे हे प्रकरण…

मुंबई पोलिसांनी काही महिन्यांपूर्वी अश्लील चित्रपटांची निर्मिती करून मोबाईल अ‍ॅप्सवर प्रदर्शित करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश केला होता. या प्रकरणात एका अभिनेत्रीला देखील अटक करण्यात आली होती. त्यानंतर राज कुंद्रा यांचे नाव समोर आले होते. चौकशीसाठी राज कुंद्रा यांना बोलवण्यात आले होते. सोमवारी अश्लील चित्रपटांची निर्मिती करणे आणि ते प्रदर्शित करण्याच्या आरोपाखाली राज कुंद्रा यांना अटक करण्यात आली आहे.

नक्की वाचा >> राज कुंद्रा गुन्हेगारी प्रकरणांची यादी : इक्बाल मिर्ची, बिटकॉईन घोटाळा, IPL सट्टेबाजी ते Porn App प्रकरण…

एकूण ११ जणांना अटक

फेब्रुवारी २०२१ मध्ये राज कुंद्रा यांच्या विरोधात तक्रार दाखल करण्यात आली होती. राज कुंद्रा यांच्या विरुद्ध अश्लील चित्रपट तयार करुन सोशल मीडियावर पोस्ट केल्याचा आरोप करण्यात आला होता. त्यानंतर मुंबई पोलिसांनी राज कुंद्रा यांची चौकशी केली. चौकशीदरम्यान राज कुंद्रा यांच्याविरोधात काही पुरावे अढळल्यामुळे त्यांना अटक करण्यात आली आहे. राज कुंद्रा यांच्यासोबतच या प्रकरणी एकूण ११ जणांना अटक करण्यात आली आहे.

यापूर्वीही झालीय अटक…

राज कुंद्रा यांना पहिल्यांदाच अटक झालेली नाही. यापूर्वीही त्यांना अनेकदा कोर्टाची पायरी चढावी लागली होती. मार्च २०२० मध्ये राज आणि शिल्पा शेट्टी यांच्या विरोधात तक्रार दाखल करण्यात आली होती. ही तक्रार मुंबईतील एनआरआय सचिन जोशी यांनी दाखल केली होती. तसेच आयपीएल सट्टेबाजी प्रकरणातही राज कुंद्रा हे अडकले होते. त्या प्रकरणात राजस्थान रॉयल्स संघाला कारवाईलाही सामोरे जावे लागले होते.