लग्न म्हटलं की काही लोक अगदी पाण्यासारखा पैसा खर्च करतात. काहीजण लग्न समारंभ अगदी भव्यदिव्य करण्यासाठी वाट्टेल तितके पैसे खर्च करायलाही मागेपुढे पाहत नाही. सध्या पाकिस्तानमधल्या एका नवरदेवाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या नवरदेवानं आपल्या लग्नात फक्त बूट आणि टायवर चक्क २५ लाखांचा खर्च केला.

वाचा : राणीच्या हातातली ती पर्स आणि ब्रिटन राजघराण्यातले काही अजब नियम

लग्नासाठी त्यानं १० तोळ्यांची सोन्याची टाय तयार करून घेतली होती ज्याची पाकिस्तानी मुल्याप्रमाणे किंमत होती पाच लाख. तर सोन्याचा मुलामा असलेला कोटही त्यानं परिधान केला होता यासाठी त्यानं ६३ हजार रुपये मोजले तर सोन्याची टाय आणि कोटला साजेसे असे सोन्याचे बूटही त्यानं तयार करुन घेतले होते ज्यासाठी त्यानं १७ लाख मोजले होते. त्याच्या शूट आणि टायच्या किंमतीत एखाद्याचं थाटामाटात लग्न झालं असतं इतकंच काय एखाद्याला छोटंसं घरही विकत घेता आलं असतं. या नवरदेवाचं नाव हाफिज सलमान शाहदिद असल्याचं समजत आहे. स्थानिक वृत्तपत्रांच्या माहितीनुसार तो इथला व्यावसायिक आहे.

वाचा : शिकण्याला वय नसतं! ७३ वर्षांचा ‘तरुण’ विद्यार्थी पाचवीत

लग्नातला त्याचा हा राजेशाही पोषाख पाहून तो पाकिस्तानच काय पण जगभरातील सोशल मीडियावर चर्चाचा विषय ठरला आहे.