भारताचा भालाफेकपटू नीरज चोप्राने शनिवारी ऑलिम्पिकमध्ये इतिहास घडवला. नीरजने दुसऱ्या प्रयत्नात ८७.५८ मीटर अंतरावर फेकलेल्या भाल्याने इतिहास घडवला आणि १०० वर्षांचा ट्रॅक आणि फिल्ड गेम्समधील भारताचा दुष्काळ संपला. १३ वर्षानंतर एखाद्या भारतीय खेळाडूने ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक पटकावलं. या यशानंतर नीरजवर सर्वच स्तरांमधून कौतुकाचा वर्षाव होत असतानाच सोशल नेटवर्किंगवरुनही त्याच्यावर सर्वच स्तरांमधून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. यामध्ये कौतुक, अभिमान याबरोबरच मीम्सचाही पाऊस पडलाय. अनेकांनी मजेदार मीम्स शेअर करत हा ऐतिहासिक क्षण साजरा केलाय. असाच एक मजेदार व्हिडीओ सोशल नेटवर्किंगवरुन व्हायरल झाला असून नीरज नाही तर या व्यक्तीने आपल्याला भालाफेकमध्ये पहिलं सुवर्णपदक मिळवून दिल्याची फिरकी नेटकऱ्यांनी घेतलीय.

नक्की वाचा >> आनंद महिंद्रांपाठोपाठ भारतीय लष्कराकडूनही सुभेदार नीजरला मिळणार मोठं सप्राइज?

Saving
बचत फक्त मोठ्यांनी नाही, लहानांनीही करावी! मुलांना अर्थसाक्षर बनवण्यासाठी ‘या’ गोष्टी ठरतील फायदेशीर
loksatta chaturang The main cause of new and old generation disputes is the mode of spending
सांधा बदलताना: ‘अर्थ’पूर्ण भासे मज हा..
kanyadan, valid marriage,
वैध लग्नाकरता कन्यादान नाही, तर सप्तपदी महत्त्वाची !
risk of H5N1 bird flu outbreak Case Was Seen in Hens At Nagpur
कोविडहुन १०० पट जास्त भीषण विषाणू उड्या मारतोय! नागपुरातही आढळलं प्रकरण, तज्ज्ञांचं मत काय?

हा व्हिडीओ टॉलिवूडमधील अभिनेता चिरंजीवीचा आहे. नीरजने भालाफेक प्रकारामध्ये देशासाठी सुवर्णपदक जिंकल्यानंतर हा व्हिडीओ ट्विटरवर व्हायरल झालाय. यामध्ये अभिनेता चिरंजीवी भालाफेक स्पर्धेत सहभागी झाल्याचं दिसत आहे. ट्विटरवरील लोकप्रिय असणाऱ्या गब्बर या अकाऊंटवरुन हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओला त्याने, “भालाफेकमधील पहिलं सुवर्णपदक,” अशी कॅप्शन देण्यात आलीय.

नक्की वाचा >> ४ लाख ३५ हजारांचे ४ भाले अन् एकूण खर्च… नीरजच्या प्रशिक्षणासाठी मोदी सरकारने किती खर्च केला माहितीये?

२४ सेकंदांच्या या व्हिडीओमध्ये चिरंजीवी कॉलेजमधील ट्रॅक आणि फिल्ड स्पर्धांमध्ये सहभागी झाल्याचं दाखवण्यात आलं आहे. केवळ भालाफेकच नाही तर त्यानंतर चिरंजीवीने साजरा केलेला आनंद आणि सेलिब्रेशनही नेटकऱ्यांच्या चर्चेचा विषय ठरत आहे.

अनेकांनी यावर मजेदार प्रतिक्रिया नोंदवल्यात.

नक्की वाचा >> टोक्योला जाण्यापूर्वीच बहिणीचा मृत्यू, आईने लपवून ठेवली बातमी; मायदेशी परतल्यानंतर ‘ती’ विमानतळावरच ढसाढसा रडली

का आणि काय पाहिलं हे?

असं काहीतरी झालं…

नक्की वाचा >> ऑलिम्पिकचा ‘गोल्डन बॉय’ नीरज मराठ्यांचा वंशज; पूर्वज लढले होते पानिपतच्या युद्धात

काय पाहिलं हे…

..म्हणून प्रेक्षक नव्हते

नक्की पाहा >> जन गण मन… १३ वर्षानंतर ऑलिम्पिकमध्ये वाजलं भारताचं राष्ट्रगीत; Video पाहताच अंगावर काटा येईल

गोल्ड पुरेसं नाही

नीरज पण गोल्ड देईल याला

डायमंड द्या…

नक्की वाचा >> नीरज चोप्राचं पंतप्रधान मोदींबद्दलचं दोन वर्षांपूर्वीचं ‘ते’ ट्विट झालं व्हायरल; म्हणाला होता, “ऐतिहासिक…”

हा व्हिडीओ टॉलिवूडमधील इदारु मिरुलू या चित्रपटातील आहे. या चित्रपटामध्ये चिरंजीवी सर्व प्रकारचे खेळ खेळणारा खेळाडू दाखण्यात आलाय. अगदी शर्यतीपासून बास्केटबॉल आणि भालाफेकपर्यंत सर्व खेळ चिरंजीवीला सहज जमतात असं या चित्रपटामध्ये दाखवलं आहे.