मोफत कॉल आणि इंटरनेट सर्फिंगसाठी तुम्ही रांगेत उभे राहून ‘जिओ’चे सीमकार्ड घेतलेय का? घेतले असेल तर तुम्हाला थोडे सावध राहावे लागेल. कारण जिओची फ्री ऑफर संपेल, तेव्हा तुमच्या घरी त्याचे बिल येण्याची शक्यता आहे आणि अटी आणि शर्तींनुसार तुम्हाला ते बिल चुकवावेच लागेल. म्हणून तुम्ही घेतलेले कार्ड प्रीपेड आहे की, पोस्टपेड त्याची खातरजमा आताच करुन घ्या.

रिलायन्स जिओकडून आपल्या ग्राहकांना मोफत सुविधा देण्यात येत आहेत. फ्री वेलकम ऑफरनुसार, रिलायन्स जिओ ३१ मार्चपर्यंत फ्री अनलिमिटेड एचडी व्हाईस, जिओ नेट वायफाय, डाटा, एचडी व्हिडीओ, एसएमएस, जिओ अॅप्स यांसारख्या सुविधा आपल्या ग्राहकांना देण्यात येत आहेत. रिलायन्सने या सुविधा प्रिपेड आणि पोस्टपेड अशा दोन्ही प्रकारांसाठी जिओच्या ग्राहकांना दिल्या आहेत. रिलायन्सच्या या सर्व सुविधा ४ जीवर देण्यात येत आहेत. त्यामुळेच या सर्व सुविधा उच्च प्रतीच्या आहेत आणि इंटरनेट सुविधाही सुपरफास्ट आहे. इंटरनेटवर व्हिडीओ न अडखळता पाहायला मिळत आहेत.

पण कंपनीकडून दिलेल्या मोफत सुविधांचा कालावधी संपुष्टात येईल, त्यानंतर पोस्टपेड ग्राहकांना त्याचे बिल भरावे लागणार आहे. त्यामुळेच तुम्ही घेतलेले सीमकार्ड प्रीपेड आहे की पोस्टपेड हे जाणून घेणे गरजेचे आहे. त्याची माहिती कशी मिळेल, हे पाहा…

सर्वात आधी तुम्ही मोबाईलमध्ये जिओचे अॅप उघडा. त्यानंतर ‘माय जिओ’ असा पर्याय येईल. त्यावर क्लिक करा.

jio-2-1

 

क्लिक केल्यानंतर मोबाईल स्क्रीनवरील पेजवर ‘वेलकम टू युअर डिजिटल लाईफ’ असे लिहिलेले असेल. त्या पेजवर सर्वात खाली लिहिलेल्या ‘स्किप साईन इन’वर क्लिक केल्यानंतर एक नवीन पेज दिसेल.

 

jio-3-2

 

या नवीन पेजवर वरील बाजुला माय जिओ असे लिहिलेले असेल. या पेजच्या डाव्या बाजुला ‘बॅलेन्स’ असे लिहिलेले असेल, तर याचा अर्थ तुमचे सिमकार्ड प्रीपेड आहे.

jio-1-2

 

बॅलेन्सऐवजी जर तिथे अनपेड अथवा अनबिल्ड अमाउंट किंवा बिल लिहिलेले असेल तर तुमचे सिमकार्ड पोस्टपेड आहे, असे समजावे.

jio-1

 

त्यामुळे रिलायन्सद्वारे देण्यात आलेल्या मोफत सुविधांची मुदत संपल्यानंतर पोस्टपेड कार्ड असलेल्या यूजर्सना बिल येण्याची शक्यता आहे.