दुबई, जो आपल्या महागड्या आणि आलिशान जीवनशैलीसाठी प्रसिद्ध आहे. सध्या एका खास गोष्टीमुळे दूबई चर्चेत आहे. दुबईतील एका कॅफेमध्ये मिळणाऱ्या चहाने नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे.हा चहा सामान्य नाही,तर २४-कॅरेट सोन्याने सजवलेला आहे. या चहाची किंमत तब्बल १ लाख रुपये आहे आणि त्याबद्दलचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

व्हिडिओमध्ये एका इन्फ्लुएंसरने या सोन्याच्या चहाची विशेषता सांगितली आहे.दुबईतील ‘बोहो कॅफे आणि रेस्टॉरंट’ या ठिकाणी ही लक्झरी चहा विकला जात आहे. हा चहा चक्क चांदीच्या कपामध्ये सर्व्ह केला जातो चणि त्यावर २४ कॅरेट सोन्याचा मुलामा चढवला जातो. गोल्ड डस्टेड क्रोइसान्टही देखील खाण्यासाठी दिला जातो,जो हा अनुभव आणखी खास बनवतो.

हेही वाचा – ताईंचा विषय लय हार्ड! गाणी ऐकत ऐकत महिलेने सहज पकडली घोरपड! Viral Video पाहून नेटकरी म्हणाले, “कोण आहेस तू?”

भारतीय चहा प्रेमी या चहाबद्दल मजेशीर प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिले, “१ लाख रुपयांत तर संपूर्ण गाव वर्षभर चहा पिऊ शकते.”दुसऱ्याने लिहिले, “आपली १० रुपयांची टपरीवरची चहा यापेक्षा जास्त समाधान देते.” या चहाच्या किंमतीवरुन अनेक मीम्स आणि कॉमेंट्स सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

हेही वाचा – ऐकावे ते नवलच! कानातील मळ विकून ही बाई कमावतेय रोजचे ९,००० रुपये! विचित्र व्यवसाय पाहून चक्रावले नेटकरी

इन्फ्लुएंसरने व्हिडिओमध्ये चहा पिताना त्याच्या खास फ्लेव्हरची आणि स्टाइलची प्रशंसा केली आहे. मात्र, भारतीयांना ही किंमत अचंबित करणारी वाटली. काहींनी म्हटले, “सोने खाऊन श्रीमंत होणार नाही, पण आपल्या टपरीवरील चहा दिवस आनंदी बनवतो.”

इंस्टाग्रामवर @gulfbuzz या हँडलवर या चहाचा व्हिडिओ पोस्ट केला असून, तो लाखो लोकांनी पाहिला आहे.दुबईची सोन्याचा चहा चहाप्रेमींसाठी नक्कीच वेगळा अनुभव ठरतो आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 1 lakh gold tea dubai indian origin cafe selling gold tea people will shocked after seeing this video snk