डोसा म्हटला की मोठ्या ताटली इतका आणि अगदीच नाही तर हातभर लांब असे चित्र आपल्या डोळ्यासमोर येते. पण प्रसिद्ध शेफ विनोद कुमार आणि त्याच्या टीमने आयआयटी मद्रास येथे एक दोन नाही तर तब्बल १०० फूटांचा डोसा बनवला आहे. यामार्फत आपल्याला गिनिस बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद करायची असल्याचे त्यांनी सांगितले आहे. हा डोसा बनवण्यासाठी ६० शेफनी एकत्रित काम केल्याचेही विनोद कुमार म्हणाले. हे रेकॉर्ड झाल्यास अहमदाबाद येथील दसपल्ला हॉटेलचे रेकॉर्ड मोडले जाणार आहे. त्यांच्या नावावर आतापर्यंतचा सर्वात मोठा म्हणजेच ५४ फूट ८ इंचाचा डोसा बनवण्याचे रेकॉर्ड होते. हे रेकॉर्ड २०१४ मध्ये करण्यात आले होते. तर आताचे १०० फूट डोसाचे रेकॉर्ड करणारे विनोद कुमार यांच्या नावावर याआधी ५ रेकॉर्ड केले आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हा १०० फूटी डोसा बनवण्यासाठी ३७.५ किलो पीठाचा वापर करण्यात आला आहे. यासाठी १०० किलो तांदळाचे पीठ, २ किलो हरभरा डाळ आणि अर्धा किलो मूग डाळ, १० किलो तांदूळ, अर्धा किलो मीठ आणि ९.५ लिटर पाणी इतके पदार्थ वापरले होते. हा डोसा तयार करण्यासाठी खास १०५ फूटांचा तवा बनवण्यात आला. यासाठी इंजिनिअरींग टीमची मदत घेण्यात आली होती. हा तवा १८० ते २०० डिग्री तापमानावर ठेवण्यात आले होते, ज्यामुळे डोसा लगेच तयार होणार नाही.