आतापर्यंत वयाची शंभरी पार केलेले आपण अनेक पाहिले असतील पण शंभरी पार केलेली जुळी भावंडं आपण क्वचितच पाहिली असणार. तेव्हा पण सगळ्यांनीच ब्राझील मधल्या या दोन आजींना भेटलंच पाहिजे. या आजींनी नुकताच आपला शंभरावा वाढदिवस साजरा केला. तोही जरा हटके स्टाईलने बरं का!

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

ब्राझीलमध्ये राहणाऱ्या मारिया आणि पोलिना या दोन्ही बहिणींनी वयाची शंभरी गाठली. कदाचित शंभरी गाठणाऱ्या जगातल्या त्या एकमेव जुळ्या बहिणी असतील. मारिया आणि पोलिनाचं कुटुंब तसं खूप मोठं. ६ मुलं, १५ नातवंड आणि १९ पतवंड एवढं मोठं त्यांचं कुटुंब. पण या सगळ्यासोबत वाढदिवस साजारा करण्यापेक्षा आजींनी थोडी वेगळी वाट धरली. आजींनी स्वतःचं फोटोशूट करायचं ठरवलं. मग काय आजींनी छान तयारी केली आणि आपले हटके स्टाईने फोटो देखील काढले. पोलिनासाठी तर त्यांचा शंभरावा वाढदिवस जास्तच खास होता कारण काही वर्षांपूर्वी त्यांना कॅन्सर झाला होता, कॅन्सरशी यशस्वी लढा देत त्या यातून बाहेर पडल्यात. तेव्हा आपली ही जोडी पुढची काही वर्षे अशीच टिकून राहावी, यासाठी दोघींनीही प्रार्थना केल्यात.