सामन्यत: म्हातपणामध्ये अनेक जण विश्रांतीला प्राधान्य देताता. वयाची ६०- ७० वर्ष पार केल्यानंतर तर अनेकांना स्वत:चे काम देखील व्यवस्थितपणे करता येत नाहीत. पण आस्ट्रेलियातील एका १०२ वर्षीय आजीबार्इंनी थक्क करणारा कारनामा करून दाखविला आहे. या आजीबार्इंनी या वयात सुद्घा चक्क १४ हजार फुटांवरून स्कायडाइव्हिंग करण्याचा इतिहास रचला. गोड चेहऱ्याच्या या आजीबार्इंची यानंतर सोशल माध्यमांवर जोरदार चर्चा सुरू आहे.
एड्रेनालाईन जंकी इरेन ओ’शेआ असे आजीबार्इंचे नाव आहे. असा कारनामा करणाऱ्या त्या जगातील सर्वात वयोवृद्घ असल्याचे मानले जात आहे. स्कायडाइव्हिंगच्या थराथक अनुभवानंतर आजीबार्इंनी आनंद व्यक्त केला. आपल्याला एकदम सामन्य वाटत असल्याची प्रतिक्रिया आजीबार्इंनी यानंतर नोंदवली. आकाशातून ताशी २२० किलोमीटर वेगाने खाली येताना त्यांचे गाल वेगाने फडफडत होते. पण त्यांच्या चेहऱ्यावर भितीचा थोडाही भाव दिसत नव्हता.
२०१६ मध्ये १०० वा वाढदिवस साजरा करताना आजीबार्इंनी स्कायडाइव्हिंग विक्रम केला होता. पण आता वयाच्या १०२ व्या वर्षी अशा प्रकाराचा कारनामा करत त्यांनी इतिहास रचला आहे. मोटार न्यूरॉन रोगाच्या निदानासाठी निधी गोळया करण्याच्या उद्देशाने त्यांनी स्कायडाइव्हिंग केले. आपल्या मुलीचा जीव या आजाराने घेतल्यानंतर त्यांनी निधी जमा करण्याच्या कामात स्वत:ला गुंतवूण घेतले.