Viral Video : शाळा हा प्रत्येकाच्या आयुष्यातील महत्त्वाचा टप्पा असतो. शाळा, शाळेच्या आठवणी कायम मनात घर जीवंत असतात. शाळेतील मित्र, शिक्षक, वर्गखोल्या कायम स्मरणात राहतात. असं म्हणतात, शाळेचे दिवस मनभरून जगावे कारण ते पुन्हा परत येत नाही. अनेकदा शाळेची किंवा शाळेतील मित्र मैत्रीणीची खूप आठवण येते पण इच्छा असूनही त्यांना भेटता येत नाही. सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये २०१० ची बॅच तब्बल १४ वर्षानंतर पु्न्हा एकत्र आली आणि त्यांनी शाळेला भेट दिली. हा व्हिडीओ पाहून तुम्हीही भारावून जाल. काही लोकांना त्यांची शाळा आणि वर्गमित्र आठवेल. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्हाला दिसेल शाळेतील एका वर्गखोलीत काही विवाहित तर काही अविवाहित मुले मुली बसलेले दिसत आहे. ते वर्गातील बाकावर बसलेले आहे. व्हिडीओमध्ये एका तरुणाचा आवाज येतोय. तो म्हणतो, “शाळेतल्या सर्व गोष्टी विसरता येतील मित्रांनो पण आपला दहावीचा वर्ग कधीच नाही..” त्यानंतर व्हिडीओवर गाणं सुरू होते, “कितीदा नव्याने तुला आठवावे, डोळ्यांतील पाणी नव्याने वाहावे…” या व्हिडीओमधील तरुण मुलामुलींच्या चेहऱ्यावरील आनंद पाहून तुम्हीही भारावून जाल. हा व्हिडीओ नगर जिल्ह्यातील कोऱ्हाळे येथील आहे. न्यू इंग्लिश स्कुल कोऱ्हाळे असे या शाळेचे नाव आहेत.

Viral video of a song sung by a school girl is currently going viral on social media
VIDEO: “कितीदा नव्याने तुला आठवावे…” शाळकरी विद्यार्थीनीचा आवाज ऐकून शिक्षकही झाले थक्क; सूर असा की अंगावर येतील शहारे
bjp ravindra chavan
Ravindra Chavan : ‘उपरा’ डोंबिवलीकर ते भाजप प्रदेश…
a beautiful sadhvi who came in mahakumbh mela became famous
Video : सुखी जीवन सोडून २८ व्या वर्षी साध्वी झालेली सौंदर्यवती चर्चेत, महाकुंभ मेळ्यातील व्हिडीओ व्हायरल
Video of a grandmother and grandfather dancing on marathi song halagi tune is currently going viral
नाद खुळा! गावच्या मिरवणुकीत डोक्यावरचा पदर खाली पडू न देता आजीबाईंचा भन्नाट डान्स; VIDEO पाहून म्हणाल “अशी पिढी पुन्हा होणे नाही”
Shocking accident video five people crushed by young man learning to drive two in critical condition the incident was caught on cctv
बापरे! कार चालवायला शिकणाऱ्या तरुणाने पाच जणांना चिरडले; VIDEO पाहून तुम्हीच सांगा चूक कुणाची?
Bride grand Welcome To The Chawla with Band
‘हा आनंद केवळ चाळीतच…’ नव्या सुनेचं असं स्वागत कधी पाहिलं नसेल; Viral Video पाहून आठवतील जुने दिवस
शेवटी लेकच आली मदतीला! पाच मुलं असूनही आई वडीलांवर ही वेळ; वंशाचा दिवा हवा म्हणाऱ्यांनी ‘हा’ VIDEO एकदा पाहाच
Emotional video of grandfather during granddaughter wedding video viral on social media
“लग्नात सगळ्या इच्छा पूर्ण झाल्या पण…”, नात आणि आजोबांचा ‘हा’ VIDEO पाहून तुमच्याही डोळ्यात येईल पाणी

हेही वाचा : भरलं भरलं “हिंदमाता” भरलं; पहिल्याच पावसात मुंबईची तुंबई, रस्त्यांना नदीचे स्वरुप…दादरमधला VIDEO पाहा

पाहा व्हायरल व्हिडीओ

हेही वाचा : Pune Video : धक्कादायक! गुडघाभर पाण्यात कारमध्ये अडकली होती महिला, पोलिसांच्या मदतीने…; व्हिडीओ पाहून येईल अंगावर काटा

neskmaajhiishaalaa या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “२६ मे रोजी शाळेत एकत्र आलेली २०१० ची बॅच” या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “आयुष्यात कधीच परत न येणारा दिवस” तर एका युजरने लिहिलेय, “खूप काही शिकवून जातो दहावीतला वर्ग” आणखी एका युजरने लिहिलेय, “माझी दहावी तर १९९४ ची आहे माझे वर्ग मित्र मैत्रिणी काय करत असतील, कुठे आहेत, कसे दिसत असतील काय माहिती, पण तो शेवटचा निरोप समारंभाचाचा दिवस आठवला की डोळ्यामध्ये पाणी येते खरंच खूप छान होते शाळेचे दिवस..”

Story img Loader