UP Topper Prachi Nigam Reacts On Trolls: उत्तर प्रदेश माध्यमिक शिक्षा परिषदेचा दहावी व बारावी इयत्तेचा निकाल अलीकडेच जाहीर झाला. यामध्ये सीतापूरची रहिवासी असलेल्या प्राची निगमने राज्यात पहिला क्रमांक पटकावला, तिला ६०० पैकी तब्बल ५९१ गुण प्राप्त झाले आहे. ९८.५ टक्के मिळवलेल्या प्राचीचे अभिनंदन करणारे पोस्टर व फोटो व्हायरल होऊ लागताच तिने व तिच्या कुटुंबाने स्वप्नातही विचार केला नसेल अशा भयंकर ट्रोलिंगचा सामना त्यांना करावा लागला. प्राचीच्या चेहऱ्यावरील केसामुळे लोकांनी तिला “तू मुलगी आहेस का”, असे प्रश्न विचारायला सुद्धा मागे पुढे पाहिले नाही. या सर्व ट्रोलर्सना प्राचीने अलीकडेच एका मुलाखतीत सडेतोड उत्तर दिलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

बीबीसी हिंदीला दिलेल्या मुलाखतीत त्यांना संबोधित करताना प्राची म्हणाली की, “ युपी बोर्डात मी टॉप केल्यावर मी व्हायरल झाले, टॉप केलं नसतं, कदाचित एक-दोन मार्क कमी पडले असते तरी बरं झालं असतं असं आधी वाटलं होतं. पण देवाने मला जसं बनवलंय तशी मी छान आहे. ज्यांना त्यात काही फरक वाटतो त्यांच्या बोलण्याने मला काही फरक पडत नाही. लोकांनी यापूर्वीही ट्रोल केलंच होतं पण यावेळी प्रमाण जास्त होतं. मी आतापर्यंतच्या आयुष्यात अनेकदा या गोष्टी ऐकल्या आहेत. पण मला याचा फरक पडत नाही, मी फक्त माझ्या अभ्यासावर लक्ष केंद्रित करते. पण ट्रोल होत असताना असेही काही लोक होते ज्यांनी मला पाठिंबा दिला, मला त्या सर्वांचे आभार मानायचे आहेत.”

प्राची निगमचं ट्रोलिंगवर सडेतोड उत्तर

याच मुलाखतीत प्राची निगमची आई ममता यांनीही बीबीसीशी बोलताना ट्रोल्सवर प्रतिक्रिया दिली. ममता म्हणाल्या की, “लोकांनी माझ्या मुलीला ट्रोल केल्यावर मला वाईट वाटलंच पण आम्ही त्याचा परिणाम प्राचीवर होऊ दिला नाही. वाईट याचं वाटतं की लोकांनी मुलीचं कर्तृत्व पाहायला हवं होतं.”

हे ही वाचा<< अगं प्राची, दहावी बोर्डात पहिली आलीस पण चेहऱ्यावरचे केस काढता आले नाही? नक्की लाज कुणी सोडलीये?

दुसरीकडे, अनेक अभिनेते व राजकीय मंडळींनी सुद्धा प्राचीला पाठिंबा देत मागील काळात पोस्ट्स केल्या होत्या. त्यापैकी एक म्हणजे काँग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधी. सूत्रांच्या माहितीनुसार गांधी यांनी निगमशी बोलून तिला अभ्यासावर लक्ष केंद्रित करण्याचा सल्ला दिला होता.