सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, दलदलीत हत्तींचा कळप अडकला आहे या हत्तींना बाहेर येणेही अवघड जात होते त्यामुळे स्थानिकांनी ताबडतोब याची माहिती प्राणीप्रेमी संघटनेला दिली. हे प्राणीमित्र तातडीने हत्तीच्या मदतीला धावून आले. त्यांनी युक्ती वापरून दलदलीत अडकलेल्या हत्तींच्या कळपाला युक्ती वापरून बाहेर काढलं त्यामुळे या हत्तीचे प्राण वाचले. अत्यंत नाट्यमयरित्या हे हत्ती एकापाठोपाठ एक बाहेर आले आणि सुखरूप जंगलात परतले.

काही दिवसांपूर्वी कंबोडियातल्या किओ सायमा वन्यजीव अभयारण्याला पुराचा तडाखा बसला होता. पुरामुळे ठिकठिकाणी मोठे नुकसान झाले होते. अशातच हत्तीचा कळप पाणी पिण्यासाठी विवरात उतराला. पुरामुळे आधीच जमीन निसरडी झाली होती त्यातून कळप उतरल्याने ही जमीन खचत जाऊन सारे हत्ती दलदलीत अडकले. १० हत्ती आणि एका पिल्लाचा या कळपात समावेश होता. या हत्तींना काही केल्या बाहेर येता येईना. त्यातून हालचाल केल्यावर ते आणखी दलदलीत रुतत चालले होते. हत्तींचा चित्कार गावक-यांच्या कानावर गेला, जर त्यांना वेळीच मदत केली नसती तर त्यांचा मृत्यू अटळ होता. एवढ्या महाकाय प्राण्याला बाहेर काढणार कसे असा प्रश्न गावक-यांना होता, पण काही प्राणीप्रेमी संघटनांनी या विवराजवळ पाय-या तयार केल्या. या पाय-यावर चढून हे हत्ती नाट्यमयरित्या बाहेर आले आणि आपला जीव मुठीत घेऊन जंगलाच्या दिशेने पळाले. वाईल्डलाईफ कंन्झर्वेशन सोसायटीने फेसबुक पेजवर हा व्हिडिओ शेअर केला आहे. आतापर्यंत हजारो लोकांनी हा व्हिडिओ पाहिला आहे.

Story img Loader