युक्रेनमध्ये सुरू असलेल्या युद्धादरम्यान अनेक लोक स्थलांतर करत आहेत. युक्रेनियन नागरिक सध्या युद्धातून जीव वाचवण्यासाठी सीमेलगतच्या देशांमध्ये पलायन करत आहेत. आतापर्यंत १० लाखांपेक्षा जास्त लोकांनी युक्रेन सोडलंय. अशातच, एका ११ वर्षांच्या युक्रेनियन मुलाने एक बॅकपॅक, त्याच्या आईची चिठ्ठी आणि हातावर लिहिलेला टेलिफोन नंबर घेऊन १ हजार किलोमीटरचा प्रवास एकट्याने केल्याची बातमी समोर आली आहे. (रशिया-युक्रेन युद्धाबद्दलच्या लाईव्ह घडामोडी वाचण्यासाठी इथे क्लिक करा)
या मुलाने १ हजार किलोमीटरचा प्रवास एकट्याने करत तो स्लोव्हाकियामध्ये पोहोचला. हा मुलगा मुळचा दक्षिणपूर्व युक्रेनमधील झापोरिझ्झिया येथील आहे. मिळत असलेल्या माहितीनुसार, आजारी नातेवाईकाची काळजी घेण्यासाठी त्याच्या पालकांना परत युक्रेनमध्ये थांबावे लागले, त्यामुळे त्यांनी या मुलाला देशातून बाहेर पाठवून दिलं.
“जर युक्रेनचे अध्यक्ष झेलेन्स्कींची हत्या झाली तर…,” अमेरिकेने सांगितला प्लान
एवढ्या लांब एक अविश्वसनीय प्रवास पूर्ण केल्यानंतर या मुलाने आपल्या स्मितहास्य आणि निर्भयपणाने तिथं उपस्थित असलेल्या अधिकाऱ्यांची मनं जिंकली. स्लोव्हाकियाच्या गृह मंत्रालयाने त्याला काल रात्रीचा सर्वात मोठा हिरो असल्याचं म्हणत फेसबुक पोस्टमध्ये त्याचं कौतुक केलंय.
Ukraine War: पाच श्वानांसह युक्रेनमधून भारतात आगमन; मानले केंद्रीय मंत्र्यांचे आभार
मिळालेल्या माहितीनुसार, मुलाच्या आईने त्याला त्याच्या नातेवाईकांना शोधण्यासाठी ट्रेनने स्लोव्हाकियाला पाठवले. त्याच्याकडे प्लास्टिकची पिशवी, पासपोर्ट आणि घडी घातलेल्या चिठ्ठीत एक मेसेज होता. जेव्हा हा मुलगा स्लोव्हाकियामध्ये आला, तेव्हा त्याच्या हातातील फोन नंबर व्यतिरिक्त त्याच्या पासपोर्टमध्ये दुमडलेल्या कागदाचा तुकडा होता. त्यावर लिहिलेल्या माहितीच्या आधारे सीमेवरील अधिकाऱ्यांनी राजधानी ब्रातिस्लाव्हा येथील त्याच्या नातेवाईकांशी संपर्क साधला आणि त्याला त्यांना सोपवलं.
‘पाकिस्तान तुमचा गुलाम आहे का?;’ संतापलेल्या इम्रान खान यांचा भर सभेत सवाल
दरम्यान, हा मुलगा सुखरुप नातेवाईकांकडे पोहोचल्यानंतर मुलाच्या आईने त्याची काळजी घेतल्याबद्दल स्लोव्हाक सरकार आणि पोलिसांचे आभार मानले आहेत.