Viral Video : मोठी भावंडं नेहमीच लहान भावंडांच्या चेहऱ्यावर आनंद बघण्यासाठी त्यांच्या आवडीच्या गोष्टी करताना दिसतात. लहान भावंडांसाठी कपडे घेणं असो किंवा त्यांच्यासाठी एखादा पदार्थ तयार करणं असो; ते सगळंच अगदी उत्साहानं करताना दिसून येतात. आज सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओत ११ वर्षांचा मुलगा त्याच्या लहान भावाच्या मदतीनं एक खास पदार्थ बनवतो आहे आणि हा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

सगळ्यात आधी मुलगा आणि त्याचा लहान भाऊ व्हिडीओत सगळ्यांना खजूर दाखवतात. त्यानंतर एक काचेचा ट्रे घेऊन, त्यात कागद ठेवतात आणि खजुराची फुलासारखी सजावट करून घेतात. नंतर एक काचेच्या बरणीच्या मदतीनं खजुराला व्यवस्थित चेचून घेतात आणि खजुरावर पीनट बटर ओतताना दिसतात. त्यानंतर काही शेंगदाणे व त्यावर चॉकलेट टाकतात आणि तयार झालेल्या पदार्थाला काही वेळासाठी फ्रीजरमध्ये ठेवतात. लहान भावाच्या मदतीनं मुलानं कसा पदार्थ बनवला एकदा तुम्हीसुद्धा व्हिडीओतून बघाच…

हेही वाचा… काय सांगता?…म्हणे अख्खं बस स्टॉप चोरीला गेलं; १० लाखांचं आठ दिवसापूर्वीच केलं होतं काम

व्हिडीओ नक्की बघा :

लहान भावाबरोबर तयार केला असा पदार्थ :

मुलाने भावाबरोबर खजुरापासून खास पदार्थ बनवला आहे. तसेच मुलाचं नाव कमोलिद्दी आहे. कमोलिद्दीन नेहमीच स्वयंपाक करण्याचं कौशल्य त्याच्या व्हिडीओतून दाखवत असतो आणि त्याच्या मदतीला त्याचा लहान भाऊसुद्धा असतो. तसेच या व्हिडीओत पदार्थ तयार करताना दोघे मजेशीर संवादसुद्धा साधताना आणि खजुराला चॉकलेटी रंगाचं फूल म्हणताना दिसत आहेत. तसेच पदार्थ तयार झाल्यानंतर केकसारखं कापून त्याची चव घेतानाही दिसून आले आहेत.

सोशल मीडियावर हा व्हिडीओ @bestchefme या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. चिमुकल्या शेफचं नाव कमोलिद्दीन असं आहे आणि तो ११ वर्षांचा आहे. तसेच हा सोशल मीडियाचा प्रसिद्ध शेफ (chef) असून, लंडनचा रहिवासी आहे. तसेच मुलाला स्वयंपाकाची खूप आवड आहे आणि तो वेगवेगळ्या पदार्थांचे व्हिडीओ बनवत असतो. लहान भावाबरोबर खास पदार्थ तयार करणारा त्याचा हा व्हिडीओ प्रेक्षकांच्या पसंतीस उतरताना दिसत आहे.