Weight Loss Diet: एका आईसाठी तिचं बाळ सर्व काही असतं, जगात कुणाच्याच बोलण्याने न झुकणारी बाई सुद्धा जेव्हा आई होते तेव्हा आपल्या चिमुकल्याच्या हट्टासाठी काहीही करू शकते. ही फक्त वाक्य नाही तर कहाणी आहे, एका २५ वर्षीय महिलेची. जिने आपल्या बाळासाठी तब्बल ६२ किलो वजन घटवले आहे. अलीकडेच सारा नावाच्या एका महिलेने आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर आपल्या वजन कमी करण्याचा प्रवास शेअर केला, यात तिने सांगितलेले कारण ऐकून एकाच वेळी दुःख, आनंद, प्रेम, अभिमान सगळ्या भावना तुमच्याही मनात दाटून येतील. साराच्या वजन कमी करण्याचा प्रवास तिच्या बाळाने तिला बघून हसण्यापासून सुरु झाला आणि मग..

कोणत्याही आईला आपल्या बाळाचं हसू लाखमोलाचं असतं पण जर तुमचं बाळ तुमच्यावर हसत असेल तर? काळजाला भोकं पाडेल अशी ही परिस्थिती साराने अनुभवली होती. २५ वर्षीय सारा काही दिवसांपूर्वी आपल्या बाळासह बागेत खेळत होती. साराचे वजन तेव्हा तब्बल ११४ किलो होते. खेळताना साराचं बाळ घसरगुंडीवर बसायला घाबरत होतं, त्याची अशी इच्छा होती की आईनेही आपल्यांबरोबर घसरगुंडीवरून यावं. बाळाच्या हट्टापायी सारा गेली पण अचानक एका घसरगुंडीवर अडकली आणि तिला हलताही येत नव्हतं, शेवटी साराच्या नवऱ्याने तिला ढकलून त्या घसरगुंडीतून बाहेर काढलं. आईची अवस्था बघून बाळ खुदुखुदू हसू लागलं. ऐरवी गोड वाटणारं बाळाचं हे हसणं साराच्या चांगलंच जिव्हारी लागलं होतं.

Garlic Rate, Vegetable Rate, Pune, Garlic,
लसूण महागला, परराज्यातील लसणाची आवक कमी
sneha chavan marathi actress got married for second time
लोकप्रिय मराठी अभिनेत्री दुसऱ्यांदा अडकली लग्नबंधनात; साधेपणाने पार…
Kitchen jugad video orange peel and milk scrub for tanning skin
Kitchen Jugaad: दुधात संत्र्याची साल टाकताच कमाल झाली; Video पाहाल तर दररोज कराल हा उपाय
Chief Minister of Telangana, Himachal and Deputy Chief Minister of Karnataka reply to BJP on the scheme Print politics
गरिबांचे पैसे गरिबांना ही काँग्रेसची हमी; तेलंगणा, हिमाचलचे मुख्यमंत्री तर कर्नाटकच्या उपमुख्यमंत्र्यांचे भाजपला प्रत्युत्तर
siddhu mussewala fans commented on borthers video
Video : सिद्धू मूसेवालाच्या आठ महिन्यांच्या भावाचं झालं अन्नप्राशन; व्हिडीओ पाहून चाहते म्हणाले, “त्याला प्रत्येक…”
Arjun Kapoor confirming breakup with Malaika Arora and told about importance of emotional freedom
मलायका अरोराबरोबर ब्रेकअपनंतर अर्जुन कपूरने सांगितले, भावनिक स्वातंत्र्य का महत्त्वाचे? जाणून घ्या, तज्ज्ञ याविषयी काय सांगतात
Police found dead body of a boy in lake but shocked as he suddenly start speaking shocking video
VIDEO: हे कसं झालं? तलावात पडलेला ‘मृतदेह’; पोलिसांनी बाहेर खेचताच अचानक उठून बोलू लागला
Can even 1.5 grams of weight gain increase the risk
१.५ ग्रॅम वजन वाढल्यानेही वाढू शकतो मधुमेहाचा धोका? तज्ज्ञांचे मत काय…

दोन मुलांची आई असणाऱ्या साराचे गरोदरपणात वजन वाढले ​​होते. तिला उच्च रक्तदाब आणि गर्भावस्थेतील मधुमेह असल्याचे निदान झाले होते. गरोदरपणात ती दिवसाला तब्बल ३००० कॅलरीज खात होती. झाल्या प्रकारानंतर साराने वजन कमी करायचं ठरवलं आणि नैसर्गिक पद्धतीने डाएट व व्यायाम सुरु केला. पण याच प्रक्रियेदरम्यान, तिला पॉलीसिस्टिक ओव्हरी सिंड्रोम किंवा पीसीओएसचे देखील निदान झाले, ज्यामुळे वजन कमी करण्याचा प्रवास कठीण झाला. यामुळेच सप्टेंबर २०२१ मध्ये साराने गॅस्ट्रिक स्लीव्ह शस्त्रक्रिया करून घेतली, काही दिवसांसाठी ती केवळ द्रव पदार्थांचे सेवन करत होती, या सगळ्या प्रवासात जेव्हा वजन कमी होऊ लागलं तेव्हा व्यायामाचा डाएटचा उत्साह आणखी वाढला. आता सुधारित निरोगी जीवनशैलीमुळे, साराचे वजन ५३ किलोवर आले आहे.

हे ही वाचा << तुमच्या उंचीप्रमाणे तुमचे वजन किती असायला हवे? Perfect बॉडी साठी पाहा सोप्पा तक्ता

साराचं डाएट

  • सकाळी अंड्याचा पांढरा भाग टोमॅटो आणि पालकचे ऑम्लेट
  • दुपारच्या जेवणासाठी, थोडा भात वाफवलेल्या भाज्या
  • रात्रीच्या जेवणासाठी कोशिंबिरीसह शिजवलेले चिकन किंवा कोळंबी

(टीप: वरील लेख हा माहितीपर आहे, यास वैद्यकीय सल्ला समजू नये, वजन कमी करायचे असल्यास तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा)