जगातील सर्वात उंचावरील रेल्वे मार्गासाठी लकवरच भारतामध्ये असेल. बिलासपूर-मनाली-लेह हा जगातील सर्वात उंचावरील रेल्वेमार्ग २०२२ पर्यंत पूर्ण होण्याची शक्यता व्यक्त केली आहेत. या छत्तीसगडमधील बिलासपूरपासून सुरु होणार हा लोहमार्ग हिमाचल प्रदेशमधील मनालीमार्गे जम्मू काश्मीरमधील लेहला जोडणारा आहे. ३, ३०० मीटर उंचीवरुन हा मार्ग जाणार आहे. भारत- चीन सिमेपर्यंत हा लोहमार्ग जाणार असल्याने देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीनेही तो फायद्याचा ठरणार आहे.

२७ जून २०१७ रोजी तत्कालीन रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांच्या हस्ते लेह येथे या लोहमार्गाचे सर्वेक्षणाच्या कामाचे उद्घाटन करण्यात आले. जम्मू-काश्मीरमधील लडाख प्रांतांमधील लेह हे सर्वात महत्वाच्या पर्यटन स्थळांपैकी एक आहे. दीड लाख लोकांची वस्ती असणाऱ्या या शहरामध्ये येणाऱ्या पर्यटकांची संख्या भरपूर आहे. या रेल्वे मार्गामुळे येथील पर्यटन व्यवसायला चालना मिळेल. चला तर मग जाणून घेऊयात या जगातील सर्वात उंचावरील रेल्वेमार्गाबद्दलच्या काही खास गोष्टी…

> बिलासपूर-मनाली-लेह या मार्गावर एकूण ३० रेल्वे स्थानके असतील.

> सुंदरनगर मंडी, मनाली, टांडी, केलाँग, कोकसार, दारचा, उप्शी, कारु, सुंदरनगर आणि तिथून पुढे लेहपर्यंत रेल्वेमार्ग जाणार आहे.

> या लोहमार्ग प्रकल्पासाठी ८३ हजार ३६० कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे.

> या मार्गाची एकूण लांबी ४६५ किलोमीटर इतकी असेल.

> तयार झाल्यानंतर जगातील सर्वात उंचावरील रेल्वेमार्ग म्हणून हा ओळखला जाईल. या मार्गावरील सर्वात उंच भाग हा समुद्रसपाटीपासून ५ हजार ३६० मीटर उंचीवर असणार आहे.

> एकूण ४६५ किलोमीटर लांबीच्या या लोहमार्गाचा ५२ टक्के भाग हा बोगद्यांमधून जाईल.

> ४६५ किलोमीटरपैकी २४४ किलोमीटर लांबीचा मार्ग हा बोगद्यांचा असेल. > एकूण ७४ बोगद्यांमधून हा २४४ किलोमीटर लांबीचा लोहमार्ग जाईल.

> या मार्गावरील सर्वात मोठा बोगदा हा २७ किलोमीटर लांबीचा असेल.

> या संपूर्ण रेल्वे मार्गावर एकूण ५२४ पूल असतील. त्यापैकी ४०० पूल छोटे तर उर्वरित १२४ मोठे पूल असतील.

> या लोहमार्गावर ७५ किमी प्रतीतास वेगाने गाड्या धावतील. त्यामुळे दिल्लीवरून लेहला जाण्यासाठी लागणारा आत्ताच ४० तासांचा कालावधी २० तासांवर येईल.

> प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर चीनमधील किंघाई- तिबेटपेक्षा मनाली- लेह हा जगातील सर्वात उंचावरील मार्ग ठरणार आहे.

> या लोहमार्गामुळे भारतीय सुरक्षादलांनाही मोठा फायदा होणार आहे. संरक्षण मंत्रालयाने चीन, नेपाळ आणि पाकिस्तान या देशांच्या सीमा रेषेजवळून रेल्वे मार्गांचा प्रस्ताव दिला आहे. १४ पैकी ४ मार्गांना तूर्तास प्राधान्य देण्यात आले आहे. त्यापैकीच बिलासपूर-मनाली-लेह हा एक मार्ग आहे.

Story img Loader