दररोजच्या व्यवहारात नाण्यांचा वापर आपण सर्वजण करत असतो. आपल्या पर्समध्ये अथवा खिशात चिल्लर पडलेली असेल. कुठल्याही प्रकारच्या व्यवहारासाठी आपल्याला पैशांची गरज भासते. या चलनात जेवढी भूमिका नोटांची आहे, तेवढीच भूमिका नाण्यांची आहे. त्यामुळे नाणी देखील नोटांच्या इतपतच गरजेची आहेत. एक रुपयांपासून १० रूपयांपर्यंतची नाणे चलनात वापरली जातात. ५० पैसे, २५ पैसे, २० पैसे, १० पैसे आणि ५ पैशांची नाणी चलनातून बाद करण्यात आली आहे. भारतीय रिझर्व बँकेचे नाण्याविषयी बरेच नियम आहेत. कदाचीत ते नियम तुम्हाला माहित नसतील. काही नियम तोडल्यास तुरूंगवासही भोगावा लागू शकतो… तर चला जाणून घेऊयात भारतीय नाण्याविषयी….
– भारतीय चलन न स्वीकारल्यास संबंधितांच्या विरोधात भारतीय दंड संहिता कलम १२४ “अ’ नुसार देशद्रोहाचा गुन्हा दाखल होऊ शकतो.
– जर कोणी चलनात असणारे नाणे घेत नसेल तर त्याच्यावर गुन्हा दाखल करू शकतो. आरोपी व्यक्तीविरोधात भारतीय दंड संहितानुसार कारवाई करण्यात येईल. रिजर्व्ह बँकमध्येही याबाबत तक्रार करू शकता.
– खरेतर कोणत्याही नाण्याच्या दोन व्हॅल्यू असतात. त्यातील एक असते नाण्याची फेस व्हॅल्यू आणि दुसरी त्याची मेटॅलिक व्हॅल्यू. सरकार हा प्रयत्न करते की, कोणत्याही नाण्याची मेटॅलिक व्हॅल्यू ही त्याच्या फेस व्हॅल्यूपेक्षा कमी असू नये, जेणेकरून लोक त्या नाण्याला वितळवण्याचा प्रयत्न करणार नाहीत.
– आपण किती रुपयांपर्यंत चिल्लर (नाणे) देऊ शकतो. यासाठीही नियम आहे. फक्त एक हजार रूपयांपर्यंतची चिल्लर आपण एकत्रित देऊ शकतो. जर त्यापेक्षा जास्त चिल्लर देऊन तुम्ही काही घेत असाल किंवा कोणाला देत असाल तर गुन्हा ठरू शकतो. समोरील व्यक्ती तुमच्यावर गुन्हा दाखल करू शकते.
– २०११ च्या नाणे अधिनियम ५ ए अनुसार, जर कोणी नाणे तोडले तर त्याला त्याच्या बाजारमुल्याएवढा दंड भरावा लागेल.
– नाणे अधिनियम ९ नुसार, जर तुम्हाला वाटत असेल समोरील व्यक्तीने बनावट नाणं दिले आहे. तर तुम्हाला त्या नाण्याला नष्ट करण्याचा आधिकार आहे. अशा स्थितीमध्ये नुकासान नाणे तोडणाऱ्याचे होईल.
– गरजेपेक्षा जास्त नाणी जवळ ठेवण्यास अनुमती नाही. तसेच नाण्यांना त्यांच्या किंमतीपेक्षा आधीक किंमतीमध्ये विकणेही गुन्हा आहे.
– नाण्यांना वितळून अन्य वस्तूची निर्मिती करणे चुकीचे आहे. असा प्रकार समोर आल्यास गुन्हा दाखल होऊ शकतो.
– कोणीही नाण्यासाठी धातूच्या तुकड्याचा वापर करू शकत नाही.
– नाण्याला वितळणे, नष्ट करणे किंवा त्याला विजा पोहचवणे गुन्ह्यामध्ये येतं
– चलनाव्यतिरिक्त नाण्यांचा वापर इतर कोणत्याही बाबीसाठे करणे चुकीचे आहे.
– वितळलेले नाणं कोणाकडेही नसावे.