आजवर तुम्ही ऐकले असेल की, वर्षात फक्त १२ महिने असतात, पण जगात असा एक देश आहे जिथे वर्षाला १२ नाही तर चक्क १३ महिने आहेत. आफ्रिकेत असलेल्या देशाचे नाव इथियोपिया असे आहे. हा देश ऑर्थोडॉक्स तेवाहिडो चर्चच्या अधिकृत कॅलेंडरनुसार चालतो. ५२५ मध्ये रोमन चर्चने या कॅलेंडरमध्ये सुधारणा केली. इतर पाश्चात्य देश ग्रेगोरियन या कॅलेंडरचे पालन करतात पण इथियोपिया याचे पालन करत नाही. यामुळे इथिओपियन कॅलेंडरमध्ये १३ महिन्यांचे वर्ष आहे, प्रत्येकी १२ महिन्यांत ३० दिवस आहेत. शेवटच्या महिन्यात ५ दिवस आणि लीप वर्षात ६ दिवस असतात. येथे शेवटच्या महिन्याला पेग्यूम असे म्हटले जाते. इथियोपियन कॅलेंडर ग्रेगोरियन कॅलेंडरपेक्षा सात ते आठ वर्षे मागे आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हा आहे सोलर कॅलेंडर

हे कॅलेंडर एक सोलर कॅलेंडर मानले जाते, जे पृथ्वीला सूर्याभोवती संपूर्ण प्रदक्षिणा घालण्यासाठी लागणार्‍या वेळेवर आधारित आहे. इथियोपियन कॅलेंडर त्याच खगोलीय गणनेवर आधारित आहे, जे आजच्या ग्रेगोरियन कॅलेंडर आणि त्याच्या पूर्ववर्ती ज्युलियन कॅलेंडरच्या मागे आहे. इथियोपियन कॅलेंडरचा कॉप्टिक आणि ज्युलियन कॅलेंडरशी जवळून संबंध आहे, परंतु ते अगदी सारखे नाही. ज्युलियन कॅलेंडरप्रमाणे इथियोपियन कॅलेंडरमध्ये कोणत्याही अपवादाशिवाय लीप वर्ष प्रत्येक ४ वर्षांनी येते. या कॅलेंडरनुसार, शतकाची सुरुवात ११ सप्टेंबर २००७ रोजी झाली.

या दिवशी साजरा केला जातो ख्रिसमस

इथियोपियन कॅलेंडरमधील फरकाचा मुख्य मुद्दा म्हणजे येशू ख्रिस्तांची जन्मतारीख. जगभरातील ख्रिश्चन समुदाय २५ डिसेंबर रोजी ख्रिसमस साजरा करतात, तर इथियोपियन ७ जानेवारी रोजी ख्रिसमस साजरा करतात.