रातोरात श्रीमंत होण्याची हौस एका १२ वर्षांच्या मुलाला खूपच महागात पडली. त्याच्या एका चुकीमुळे त्याला ‘गुगल’कडून जवळपास ७४ लाखांहून अधिक बिल देण्यात आहे. एवढे मोठे बिल पाहून त्याच्या आई- वडीलांना देखील आर्श्चयाचा धक्का बसला आहे.
स्पेनमध्ये राहणा-या जोज जॅवीएर या १२ वर्षाच्या मुलाला युट्यूबवर प्रसिद्ध व्हायचे होते. या मुलाचा ब्रास बँड देखील आहे. त्यामुळे रातोरात श्रींमती आणि प्रसिद्धी मिळवण्याच्या नादात या मुलाने आणि त्याच्या मैत्रिणीने चुकून ‘गुगल अॅड सेन्स’ ऐवजी ‘गुगल अॅडवर्ड’ सेवा सबस्क्राइब केली. या घोळामुळे त्याला गुगल अॅडवर्ड सर्व्हिसकडून जवळपास ७४ लाखांहूनही अधिक रुपयांचे बिल आले. ‘गुगल अॅड सेन्स’ मध्ये एखाद्या वेबसाईट्वर किंवा व्हिडिओमध्ये गुगलकडून जाहिराती देण्यात येतात आणि या जाहिराती दाखवण्यासाठी गुगलकडून वेबसाईट मालक किंवा युट्युबरला ठराविक रक्कम दिली जाते. तर ‘गुगल अॅडवर्ड सर्व्हिस’ मध्ये गुगल हे विक्रेत्यांच्या उत्पादनाची जाहिरात करतो. त्यासाठी ही सेवा घेणा-याला गुगलला पैसे द्यावे लागतात. या मुलांचा या दोन सेवांमध्ये घोळ झाला त्यामुळे त्यांनी चुकीची सेवा सबस्क्राइब केली. ही सेवा सबस्क्राइब केल्यानंतर या मुलाने आपल्या बँक खात्याची विस्तृत माहितीही अॅडवर्डला दिली. त्यामुळे काही काळानंतर गुगलकडून १ लाख २० हजार युएस डॉलरचे बिल जोजच्या घरी आले. बँकेनेही इतक्या मोठ्या रकमेचा व्यवहार झाला असल्याची माहिती आधिच जोजच्या आईला दिली होती. जोजच्या आईने जोजसोबत बँकेत संयुक्त खाते उघडले होते. गुगलकडून एवढे मोठे बील आल्यावर जोजच्या आईला धक्का बसला. मुलाच्या या कृत्याची त्याच्या आईला कल्पना नव्हती.
‘गुगल अॅडवर्ड सर्व्हिस’ कडून इतकी मोठी रक्कम थकवल्यानंतर जोजचा शोध घेण्यात आला. तेव्हा जोज हा १२ वर्षांचा मुलगा असल्याचे त्यांच्या लक्षात आले. चौकशीत जोजने अनावधानाने चुकीची सेवा सबस्क्राइब केली असल्याचे गुगलच्या लक्षात आले. त्यामुळे जोजचे वय लक्षात घेता गुगलने त्याला माफ केले आहे.
Google Adwords: इंटरनेटवर पैसे कमावण्याची हौस १२ वर्षाच्या मुलाला पडली महागात
गुगलकडून आले ७४ लाखांचे बिल
Written by लोकसत्ता टीम
Updated:
First published on: 07-10-2016 at 14:14 IST
मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 12 year boy owing a approximately 79 lakh to google