तंत्रज्ञान आज अगदी लहान मुलांपर्यंत पोहचलं आहे असं म्हटल्यास चुकीचं ठरणार नाही. तांत्रिक दृष्ट्या स्वत:ला कंप्युटर आणि डिजीटल जगाशी जोडून घेण्यामध्ये मुलं ही प्रौढांपेक्षा आघाडीवर असल्याचं अनेकदा दिसून येतं. आज तंत्रज्ञान क्षेत्राची वाढती व्यप्ती आणि भविष्य पाहता शालेय जीवनापासूनच कोडींगसारखे विषय शिकवले जातात. आता इतक्या लहान वयात कोडींगसारखे विषय शिकवावेत की नाही याबद्दल मतमतांततरे असू शकतात. मात्र अशाच प्रकारे कोडींग शिकणारा लंडनमधील एक १२ वर्षीय मुलगा सध्या जगभरामध्ये चर्चेचा विषय ठरत आहे. या मुलाने सुट्ट्यांमध्ये घरी बसल्या बसल्या आपल्या कोडिंगच्या प्रेमापोटी केलेल्या कामातून तब्बल दोन कोटी रुपये कमवले आहेत. त्याच्या या कमाईच्या आकड्यांमुळेच तो सध्या चर्चेत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

१२ वर्षांच्या या मुलाचं नाव बेनयामिन अहमत असं आहे. बेनयामिनने कंप्युटरवर वीयर्ड व्हेल्स नावाचं एक पिक्सलेटेड आर्ट वर्क म्हणजेच इमोंजी बनवलं आहे. त्याने हेच आर्टवर विकून २ कोटी ९४ लाख रुपये (२ लाख ९० हजार पौंड म्हणजे अगदी आजच्या चलनाच्या दरानुसार सांगायचं झाल्यास २ लाख ९३ हजार ३८ हजार ७९८ रुपये) कमवले आहेत. ही कलाकृची नॉन फंजिबल टोकन्स म्हणजेच एनएफटीने विकत घेतील आहे. हे काम म्हणजे बेनयामिनच्या संकल्पनेतून साकारलेली रचानात्मक डिजीटल कलाकृती असल्याचं सांगण्यात आलं आहे. यामधील रचनात्मक संकल्पनेमुळे या कलाकृतीसाठी एवढे पैसे मोजण्यात आलेत.

बीबीसीने दिलेल्या वृत्तानुसार बेनयामिन आणि त्याच्या भावाला त्यांच्या वडीलांनी वयाच्या पाचव्या आणि सहाव्या वर्षापासूनच कोडींग शिकवण्यास सुरुवात केली. इम्रान यांनी आपल्या दोन्ही मुलांची आवड पाहून प्रशिक्षण देण्यास सुरुवात केली. इम्रान हे स्वत: सॉफ्टवेअर इंजिनयर आहेत. इम्रान यांनी दिलेल्या माहितीनुसार सुरुवातीला त्यांची दोन्ही मुलं गंमत म्हणून कोडिंग करायचे. मात्र त्यांना यामध्ये फार वेगाने गोष्टी समजून लागल्या. अगदी दिवसातून २० ते २५ मिनिटं सराव करुनही त्यांना यामध्ये चांगली गती आल्याने इम्रान यांनी त्यांना गांभीर्याने या गोष्टीकडे पाहण्यासाठी आणि समजून घेण्यासाठी मदत केली.

बेनयामिनला स्वीमिंग, बॅटमिंटन आणि तायक्वांडोची आवड आहे. तो या तिन्ही गोष्टींमध्ये आपला वेळ घालवतो आणि उरलेल्या वेळात कोडींग करतो. बेनयामिनच्या मते एखाद्या मुलाला कोडिंगच्या क्षेत्रात यायचं असेल तर त्याने पालकांच्या दबावाखाली असा निर्णय़ घेता कामा नये. समोर आलेल्या माहितीनुसार क्रिप्टोकरन्सीमध्ये रक्कम देण्यात आल्याने तिची किंमत कमी जास्त होऊ शकते.