आतापर्यंत अनेक सौंदर्य स्पर्धा तुम्ही पाहिल्या असतील, कमनीय बांधा, सडपातळ शरीर, गोरा वर्ण, सरळ केस अशा अनेक मॉडेल्स या स्पर्धेत उतरतात. खरं तर या सौंदर्य स्पर्धांमध्ये गोरा वर्ण, सडपातळ शरीर, अधिक उंची याच सौंदर्याच्या परिभाषा प्रमाण मानल्या जातात. पण या परिभाषा मोडीत काढत १२० किलो वजनाच्या इस्टेफेनिया हिने सौंदर्य स्पर्धेचा किताब पटकावला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

वाचा : व्हायरल झालेल्या फोटोंमधील ‘ती’ महिला जयललिता यांची कन्या नव्हे!

नुकतीच आर्जेंटिनामध्ये एक सौंदर्य स्पर्धा पार पडली. या स्पर्धेमध्ये आर्जेंटिनामधल्या अनेक सौंदर्यवती मॉडेल्सने सहभाग घेतला होता. या सगळ्या स्पर्धकात इस्टेफेनिया ही फारच वेगळी होती. इतर स्पर्धकांसारखी म्हणावी तशी ती उंचही नव्हती, ना साईज झिरो मॉडेल सारखी सडपातळ. तरीही तिने सौंदर्यवतीचा किताब पटकावला. इस्टेफेनिया या चोवीस वर्षीय मॉडेलचे वजन १२० किलो, म्हणजे या सगळ्या मॉडेल्सच्या तुलनेत कितीतरी जास्त. पण तरीही भेदाच्या सा-या सिमा तोडत तिने हा किताब पटकावला.  आज तिला सगळेच ‘Queen of Vendimia’ या नावाने ओळखतात. ‘आपल्यासाठी ही सौंदर्य स्पर्धा नव्हतीच. मॉडेलिंग विश्वातील जुन्या समजूती मला खोडायच्या होत्या म्हणूनच मी आर्वजून या स्पर्धेत भाग घेतला’ असे २४ वर्षीय इस्टेफेनियाने सांगितले.

वाचा : मुलीच्या लग्नात पित्याने ठेवले कॅशलेस रिसेप्शन