अनेकदा अशा घटना घडतात जेव्हा लहान मुलं, आपली हुशारी आणि प्रसंगावधान दाखवितात आणि मोठी दुर्घटना टाळतात. असाच काहीसा प्रसंग युएसमधील एका लहान मुलासोबत घडला आहे. स्कूलबसचा चालक अचानक बेशुद्ध झाल्यामुळे मुलांचा जीव धोक्यात आला होता. दरम्यान सातवी इयत्तेतील मुलाच्या प्रसंगावधानामुळे सर्वांचा जीव वाचला. हा सर्व घटना सीसीटीव्ही व्हिडिओमध्ये कैद झाले आहे. हा व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर व्हायरल झाला आहे.
१३ वर्षीय मुलाने वाचवला जीव
आता व्हायरल झालेला व्हिडिओ गुड न्यूज मूव्हमेंटने इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. या क्लिपमध्ये एका बस चालकाचे बेशुद्ध पडण्याचे सीसीटीव्ही फुटेज दाखवण्यात आले आहे. डिलन नावाच्या मुलाच्या ते लक्षात आले आणि त्याने तातडीने गाडीचे ब्रेक मारण्यासाठी धाव घेतली. चालक पूर्णपणे बेशुद्ध असल्याने त्याने 911 वर कॉल करण्याची सूचनाही केली..
हेही : तुम्ही कधी पिवळं कलिंगड खाल्लं आहे का? चवीला अत्यंत गोड असलेल्या ‘या’ फळाबाबत जाणून घ्या
व्हायरल व्हिडिओ पाहा :
सोशल मीडियावर व्हायरल झाला व्हिडिओ
सोशल मीडिया वापरकर्त्यांनी डिलनच्या प्रसंगवधान आणि धैर्याचे कौतुक केले आणि प्रतिक्रिया दिल्या आहे. “हा तरुण त्याला मिळालेल्या प्रत्येक कौतुकास पात्र आहे. शाब्बास, डिलन,” एका वापरकर्त्याने लिहिले. दुसर्या वापरकर्त्याने प्रतिक्रिया केली, “काय नेता आहे! निडर, मजबूत आणि सक्षम! अभिनंदन डिलन!”
हेही वाचा : आजपर्यंत शेवटचे असलेले उत्तराखंडमधील माणा गाव आता झाले पहिले, कसं ते जाणून घ्या
बस चालकाची प्रकृती आहे स्थिर
शाळेचे अधीक्षक आणि शहराच्या महापौरांनी देखील डिलनच्या धैर्याशील आणि जीव वाचवण्याच्या प्रयत्नांचे कौतूक केले. कॅप्शननुसार बस चालकाची प्रकृती स्थिर आहे.