Bike Stunts Viral Video : सोशल मीडियावर प्रकाशझोतात येण्यासाठी काही माणसं खतरनाक स्टंटबाजी करून जीव धोक्यात टाकतात. रस्त्यावरून प्रवास करताना दुचाकीवर स्टंटबाजी करण्याचं फॅड दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. काही तरुण मुलं दुचाकीवर स्टंटबाजी करून अपघाताला आमंत्रण देत असतात. अशाच प्रकारचा धक्कादायक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. तीन दुचाकीवरून एक दोन नाही, तर तब्बल १४ जणांनी प्रवास केल्याचा व्हिडीओ समोर आला आहे. रस्त्यावरून दुचाकी चालवताना बेभान झालेल्या तरुणांनी खतरनाक स्टंटबाजी करुन जीव धोक्यात टाकण्याचा प्रयत्न केला. उत्तर प्रदेशच्या बरेली-नैनीताल हायवेवर १४ मुलांनी तीन दुचाकींवर स्टंटबाजी केल्याचं व्हिडीओच्या माध्यमातून उघडकीस आलं आहे.
तरुणांच्या स्टंटबाजीचा व्हिडीओ व्हायरल होताच पोलिसांनी केली कारवाई
उत्तरप्रदेशच्या बरेली-नैनीताल हायवेवरून तीन दुचाकींवर १४ जण प्रवास करत होते. एका दुचाकीवर सहा जण असल्याचं व्हायरल झालेल्या व्हिडीओत पाहायला मिळत आहे. आणि इतर दोन दुचाकींवर प्रत्येकी चार जण प्रवास करत होते. रस्त्यावर केलेल्या खतरनाक स्टंटबाजीचा व्हिडीओ व्हायरल झाल्यावर पोलिसांनी कारवाई करत दुचाकी जप्त केल्या आहेत. पोलिसांनी या तरुणांना स्टंटबाजी करताना पाहिल्यावर ते पळून गेले. पोलिसांनी दुचाकी जप्त केल्या असून पुढील तपास सुरु असल्याचं म्हटलं आहे.
इथे पाहा व्हिडीओ
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दुचाकीच्या नंबरवरून तरुणांना ट्रॅक करण्यात आलं. स्टंटबाजी करणाऱ्या तरुणांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. बरेलीचे एसएसपी अखिलेश कुमार चौरसीया म्हणाले, या घटनेबाबत आम्हाला माहिती मिळाल्यानंतर दुचाकी जप्त करण्यात आल्या. तपास सुरु असून पुढील कारवाई करण्यात येत आहे. उत्तर प्रदेशच्या एका हायवेवर तीन दिवसांपूर्वी अशाच प्रकारची स्टंटबाजीची घटना घडली होती. एक तरुणी धावत्या कारमध्ये खतरनाक स्टंटबाजी करून सेल्फी घेण्याचा प्रयत्न करत असल्याचं उघडकीस आलं होतं.