फक्त १४ वर्षांच्या मुलीने अशी सायकल बनवली आहे ज्याची कल्पना एका सायकल बनवणा-या कंपनीही क्वचितच केली असेल. ही अशी सायकल आहे जी चालवण्यासाठी पॅडलिंग करण्याची गरज चालकाला भासणार नाही त्यामुळे ज्यांच्या गुडघ्याचे त्रास आहे अशा व्यक्तीपासून  शररिक विकलांग असलेली व्यक्ती देखील या सायकलचा वापर करू शकते. ओशीडाच्या रोरकेला गावात राहणारी तेजस्वीनी प्रियदर्शनी हिने ही अनोखी सायकल तयार केली आहे. आपल्या बाबांच्या मदतीने शाळेतल्या एका प्रकल्पसाठी तिने ही सायकल बनवली होती. पण या सायकल मागची कल्पना पाहता अशी सायकल क्विचितच कोणी बनवली असेल. या सायकलच्या  मागे तेजस्वीनीने १० किलोचा हवा भरलेला सिलेंडर बसवला आहे. यात असणा-या हवेच्या दाबामुळे सायकलचे पॅडल आपोआप फिरतात. वडिलांच्या मदतीने तीने ही सायकल बनवली आहे. दरवर्षी तेजस्वीनीच्या शाळेत वैज्ञानिक प्रकल्प बनवण्याची स्पर्धा असते. शाळेतील अनेक विद्यार्थी भन्नाट कल्पना वापरून नवनवे प्रकल्प बनवतात. पण यंदा तेजस्वनीचा प्रकल्प या सगळ्यांहूनही हटके होता. विशेष म्हणजे राज्यातील अनेक शाळांमध्ये तेजस्वीचा प्रकल्प प्रदर्शनासाठी ठेवण्यात आला आहे.