इंटरनेटवर सध्या व्हायरल झालेल्या #10YearChallenge मध्ये नेटकरी त्यांचा २००९ सालात काढलेला आणि आत्ता म्हणजेच १० वर्षांनंतरचा असे दोन फोटो सोशल मडियावर शेअर करताना दिसत आहेत. दहा वर्षात आपल्यामध्ये किती बदल झाला आहे दाखवण्यासाठी नेटकरी हे चॅलेंज स्वीकारताना दिसत आहेत. या चॅलेंजमध्ये आत्तापर्यंत अनेक सेलिब्रिटी, ब्रॅण्ड्सबरोबर सामान्यांनाही आपले २००९ चे आणि २०१९चे फोटो पोस्ट केले आहेत. मात्र आता व्हायरल झालेल्या या आगळ्या वेगळ्या चॅलेंजचे मिम्स व्हायरल झाले आहेत. यामध्ये अगदी मराठी मालिकांपासून ते राजकारण आणि खेळांपर्यंतचे अनेक प्रकारचे मिम्स सोशल मडियावर व्हायरल झाल्याचे दिसून येत आहेत. अशाच काही मोजक्या व्हायरल झालेल्या भन्नाट मिम्सवर टाकलेली नजर…
एकंदरितच काय तर या नवीन व्हायरल चॅलेंजमुळे जुन्या आठवणी ताज्या होण्याबरोबरच नेटकरी एकमेकांना हसवतानाही दिसत आहेत.