Ayodhya Ram Mandir Fake Video: अयोध्या राम मंदिराच्या उद्घाटनाची तयार अत्यंत उत्साहात सुरु आहे. जगभरात राम लल्लाच्या मंदिर प्रवेशाची चर्चा सुरु आहे. अशातच अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर वारंवार व्हायरल होत आहेत ज्यात काही तर अगदी दिशाभूल करणारे आहेत. लाइटहाऊस जर्नालिज्मला सोशल मीडियावर अशीच एक पोस्ट आढळून आली. अयोध्येतील मिरवणुकीत एक मुलगा फुले फेकत असताना आयोजकांनी त्याला मारहाण केली, असा दावा पोस्टमध्ये करण्यात आला होता. नेमकं हे प्रकरण काय आहे हे पाहूया..
काय होत आहे व्हायरल?
ट्विटर यूजर Shazia Nuzar official ने व्हायरल व्हिडिओ आपल्या प्रोफाइल वर शेअर केला.
इतर यूजर्स देखील व्हायरल व्हिडिओ शेअर करत आहेत.
तपास:
आम्ही InVid टूलमध्ये व्हिडिओ अपलोड करून आणि त्यातून स्क्रीनग्रॅब मिळवून तपास सुरू केला. रिव्हर्स इमेज सर्चमुळे आम्हाला जय प्रकाश शर्मा यांच्या ट्विटर (X) अकाऊंटवरील पोस्ट दिसून आली.
गीता महोत्सवादरम्यान ही घटना फरिदाबादमध्ये घडली असल्याचे पोस्टमध्ये नमूद करण्यात आले आहे. आम्ही नंतर त्याच बद्दल कीवर्ड सर्च केले.
त्यात आम्हाला या घटनेसंबंधित विविध बातम्या सापडल्या.
बातमीत नमूद केले आहे: फरिदाबादमधील दोन सरकारी शाळेतील शिक्षकांनी शाळेतील एका कार्यक्रमादरम्यान १५ वर्षांच्या विद्यार्थ्याला मारहाण केल्याचा आरोप आहे, विविध अहवालांनुसार. ही घटना, व्हिडिओमध्ये कैद झाली आणि सोशल मीडियावर व्हायरल झाली, विद्यार्थ्याच्या वडिलांनी तक्रार केल्यावर शिक्षकांविरुद्ध एफआयआर नोंदवण्यात आला.
विद्यार्थ्याने एका शिक्षकावर फुले फेकल्याने हाणामारी सुरू झाली होती. शिक्षकाने १५ वर्षीय विद्यार्थ्याच्या छातीत आणि पोटात लाथ मारली असे दिसत आहे.
आम्हाला या बाबतीत एक व्हिडिओ रिपोर्ट देखील सापडला.
तसेच अयोध्या पोलिसांच्या X हॅन्डलवरून हा दावा खोटा असल्याचे देखील सांगण्यात आले होते.
निष्कर्ष: राममंदिर उत्सवादरम्यान मिरवणुकीत फुले फेकल्यामुळे आयोजकांनी मुलाला मारहाण केल्याचा व्हायरल दावा खोटा आहे. हा व्हिडीओ अयोध्येचा नसून फरीदाबादचा आहे जिथे एका शालेय विद्यार्थ्याला मारहाण केल्याप्रकरणी दोन शिक्षकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.