प्रवासादरम्यान वेळ जावा यासाठी अनेक खेळ खेळण्यात येतात. त्यात ‘पत्ते’ तर आपण आवडीने खेळायला घेऊन जातो. तुम्ही आतापर्यंत पत्त्यांचा खेळ अनेकदा खेळला असाल. पण, कोलकाता येथील एका १५ वर्षांच्या मुलाने पत्त्यांची रचना करून गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डसमध्ये (Guinness Book of World Records) आपले नाव कोरले आहे. एका मुलाने पत्त्यांची रचना करून विश्वविक्रम केला आहे. त्याने प्लेइंग कार्ड स्ट्रक्चरमध्ये कोलकात्याच्या चार प्रतिष्ठित इमारतींची रचना केली आहे; जे पाहून तुम्हाला आश्चर्य वाटेल.
गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डसमध्ये आपले नाव कोरणाऱ्या या मुलाचे नाव ‘अर्णव डागा’ असे आहे. पत्त्यांचा उपयोग त्याने अदभुत कला दाखवण्यासाठी केला आहे. अर्णवने कोलकात्याच्या चार प्रतिष्ठित इमारतींची रचना पत्त्यांपासून केली आहे. त्याने अगदीच बारकाईने या इमारतींचा अभ्यास केला आहे आणि प्रत्येक इमारतीची वैशिष्ट्ये लक्षात ठेवून त्यांची रचना केली आहे. तसेच खास गोष्ट अशी की, पत्त्यांची ही रचना करण्यासाठी त्याने गम किंवा चिकटपट्टी यांची मदत घेतलेली नाही; त्यामुळे तुमच्या आश्चर्यात अधिकच भर पडेल. कशा प्रकारे अर्णवने पत्त्यांची रचना केली एकदा तुम्हीसुद्धा व्हिडीओतून बघाच…
व्हिडीओ नक्की बघा :
एक लाख ४३ हजार पत्त्यांनी रचल्या इमारती :
अर्णवला कोलकात्याच्या चार प्रतिष्ठित इमारतींची रचना पत्त्यांपासून करण्यासाठी पूर्ण ४१ दिवसांचा कालावधी लागला आहे. या रचनेसाठी त्याने एक लाख ४३ हजार पत्त्यांचा उपयोग केला आहे. पत्त्यांपासून तयार केलेल्या या खास रचनेची लांबी ४० फूट, उंची ११ फूट व रुंदी १६ फूट ८ इंच इतकी होती. या उत्तम कामगिरीमुळे त्याची नोंद ‘गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डस’मध्ये करण्यात आली आहे. सगळ्यात मोठे प्लेइंग कार्ड स्ट्रक्चर (Playing Card Structure) बनवण्याचा विश्वविक्रम या मुलाने केला आहे.
सोशल मीडियावर हा व्हिडीओ गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डस यांच्या अधिकृत @GWR एक्स (ट्विटर) अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. ३.३५ मिनिटांच्या या व्हिडीओत तुम्हाला अर्णवची उत्तम कामगिरी आणि पत्त्यांच्या रचनेतून कोलकात्याच्या प्रतिष्ठित इमारतींची खास झलक पाहता येईल; जे पाहून तुम्ही थक्क होऊन जाल. मग तुम्ही अर्णवच्या मेहनतीचे कौतुक केल्याशिवाय राहणार नाही एवढे नक्की