16 Feet King Cobra Video Viral : सापांचे समोर दिसला की अनेकांच्या अंगावर शहारा आल्याशिवाय राहत नाही. पण जर किंग कोब्रासारखा भयानक साप जवळपास असेल, तर सर्वांची पळताभूई झाल्याशिवाय राहत नाही. कधी हा कोब्रा टॉयलेट सीटच्या आतमध्ये लपलेला असतो, तर कधी शॉवर लटकलेला असतो. तक कधी स्कुटीच्या आत शिरून शांत झोपलेला असतो. या किंग क्रोबाचे व्हिडीओ पाहून अनेकांच्या अंगावर काटा आल्याशिवाय राहत नाही. किंग कोब्राने हल्ला केल्याचे व्हिडीओही अनेकदा व्हायरल होत असतात. आताही अशाच प्रकारचा एक खतरनाक व्हिडीओ समोर आला आहे. एक विशाल किंग कोब्रा एका गोशाळेत लपलेला असतो. त्यानंतर काय घडतं? हे या व्हायरल व्हिडीओच्या माध्यमातून जाणून घेऊयात.
हा व्हिडीओ उत्तराखंडच्या अल्मोडामधील चौमू गावातील असल्याचं बोललं जात आहे. वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी या कोब्राला रेस्क्यू केलं आहे. हा किंग कोब्रा दिसायला इतका खतरनाक आहे की, व्हिडीओ पाहिल्यानंतर नेटकऱ्यांनी भन्नाट प्रतिक्रिया दिल्या आहेत. हा साप पकडताना वन विभागाच्या अधिकाऱ्यांच्याही नाकी नऊ आल्याचं व्हिडीओ पाहायला मिळत आहे. पावसाळाच्या हंगामात कोब्रा अशा ठिकाणी राहणे पसंत करत नाही. मग हा महाकाय कोब्रा कुठून आला, असा प्रश्न सर्वांनाच पडला आहे.
इथे पाहा व्हिडीओ
गोशाळेत असलेली गाय, बकरी आणि इतर प्राण्यांनी या सापाला पाहून आरडाओरडा सुरु केला. त्यानंतर शेजारी असलेल्या माणसांना या सापाबद्दल माहित झालं. त्यानंतर लोकांना या ठिकाणी धाव घेतली आणि समोर दिसला एक विशाल किंग कोब्रा. या किंग कोब्राला पाहून सर्वांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं. त्यानंतर या सापाला पकडण्यासाठी वन विभागाची टीम याठिकाणी पोहोचली आणि घनदाट जंगलात या किंग कोब्राला सोडून दिलं.