एक महिला तिच्या वैयक्तिक कामासाठी आया शोधत आहे, मात्र तिला अशी आया पाहिजे, जी २४ तास तिची काळजी घेईल, ती सांगेल ते कामे करेल. शिवाय या कामासाठी ती महिला आयाला महिना एक दोन नव्हे तर तब्बल १६ लाखांहून अधिक पगार देण्यासाठी तयार आहे. या महिलेने आयाला कोणती कामे करावी लागतील याची यादी तयार केली आहे. ज्याची जाहिरात सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. हे प्रकरण चीनमधील शांघाय शहरातील आहे.

साऊथ चायना मॉर्निंग पोस्टच्या वृत्तानुसार, या महिलेने वैयक्तिक आया शोधण्यासाठी कंपनीमार्फत जाहिरात दिली आहे. या जाहिरातीमध्ये आयाला तिची सर्व कामे करावी लागतील सांगण्यात आलं आहे. खाण्यापिण्यापासून ते घर साफ करण्यापर्यंत सर्व कामे करावी लागतील. तसेच तिच्या पायांमध्ये शूज देखील घालावे लागतील. ड्रेसिंग आणि मसाजही करावी लागेल. या कामाच्या बदल्यात आयाला महिना २० हजार डॉलर म्हणजेच जवळपास १६ लाखांपेक्षा जास्त पगार मिळणार आहे. शिवाय या कामासाठी आयाला महिलेच्या घरात राहावे लागेल. तिला खाणेपिणे मोफत असेल इतकच नव्हे तर घरातील सर्व सुविधांचा लाभ देखील घेता येणार आहे.

Flipkart Cancellation Fee Rule Charges
Flipkart Cancellation Fee : ऑनलाइन ऑर्डर रद्द करताच पैसे द्यावे लागणार? फ्लिपकार्टचा ‘हा’ नियम जुना, वाचा कंपनी काय म्हणते
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
Puneri pati shopkeeper display puneri pati on borrow photo viral on social media funny puneri pati
PHOTO: पुणेकरांचा विषयच हार्ड! उधारी रोखण्यासाठी जुगाड; दुकानात लावली अशी पाटी, लोकं स्वप्नातही मागणार नाही उधार 
Mother strangled her child shocking video viral on social media
आई की वैरीण? चिमुकल्या मुलाला जमिनीवर झोपवलं, गळा आवळला अन्… VIDEO पाहून होईल काळजाचं पाणी पाणी
Man beaten Young woman on stage who was performing shocking video viral on social media
कोणाच्या परिस्थितीचा असा फायदा घेऊ नका! त्याने भरस्टेजवरच तरुणीबरोबर ‘असं’ काही केलं की…, VIDEO पाहून येईल संताप
Auto driver written a message on back side of his auto goes viral on social media
“प्रेम एक कला पण…” रिक्षाच्या मागे पठ्ठ्यानं वयात येणाऱ्या तरुणाईला दिला सल्ला; PHOTO पाहून तुमचं मत नक्की सांगा
Shocking video Bat Spotted Eating Chikoo In Pune Market; Video Raises Health Concerns
पुणेकरांनो तुम्हीही बाजारातून फळं घेताय का? थांबा! ‘हा’ प्रकार पाहून पायाखालची जमीन सरकेल; VIDEO एकदा पाहाच
Bull attacked a person while he was dancing in front of him viral video on social media
बैलाशी मस्ती आली अंगाशी! माणसाच्या ‘या’ कृत्यामुळे बैल पिसाळला, शिंगाने उडवलं अन्…, VIDEO मध्ये पाहा नेमकं काय झालं?

हेही पाहा- “अग माईक बंद कर तुझा…” मिटींगमध्ये महिलेचा विचित्र प्रताप; मॅनेजरने शेवटी मेसेज केला अन्…

अर्जदारांसमोर ठेवल्या ‘या’ अटी –

व्हायरल झालेल्या जाहिरातीत अर्जदारांसाठी काही अटी ठेवण्यात आल्या आहेत. ज्यामध्ये ‘दक्ष राहा आणि जास्त स्वाभिमान बाळगू नका’ असं लिहिण्यात आलं आहे. या जाहिरातीमध्ये, अर्जदारांची उंची १६५ सेमीपेक्षा जास्त आणि वजन ५५ किलोपेक्षा कमी असावी. तसेच अर्जदार बारावी पास असावी. ती दिसायला व्यवस्थित, चांगली गायक आणि डान्सर देखील असावी अशा अटी जाहिरातीमध्ये देण्यात आल्या आहेत.

हेही पाहा- गुपचूप निघालेल्या सापाची माकडाने ओढली शेपटी, स्वत:च्या बचावासाठी सापानेही केला भयंकर हल्ला, थरारक Video व्हायरल

या महिलेची जाहिरात शांघायस्थित हाऊसकीपिंग सर्व्हिस कंपनीच्या एजंटने प्रकाशित केली होती. ही कंपनी मुख्यतः ‘मध्यमवर्गीय’ ग्राहकांना सेवा देते. सोशल मीडिया यूजर्स या जाहिरातीवर वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. काहींनी नोकरीत रस दाखवला तर काहींनी ही जाहिरात खोटी असल्याचं म्हटलं आहे. एका यूजरने लिहिले आहे, पगार मजबूत आहे पण मान अजिबात नाही. दुसर्‍याने, ही महिला कोणत्या जगात राहते. तर एका नेटकऱ्याने या महिलेला आया पाहिजे की गुलाम? अशी प्रतिक्रिया दिली आहे. तर अनेकांनी या महिलेवर टीका देखील केली आहे.

Story img Loader