पोहणे काही सोपे काम नाही. ते येण्यासाठी भरपूर प्रशिक्षण घ्यावे लागते, अन्यथा ते जिवावर बेतू शकते. प्रशिक्षण घेतानाही जिवाचा थरकाप होतो. मात्र, पोहणे आल्यास त्याचे शरीराला अनेक फायदे होऊ शकतात. पोहणे हे व्यायामापेक्षा कमी नाही. याने शरिराबरोबरच डोक्याचाही व्यायाम होतो. तुम्ही अनेक आंतरराष्ट्रीय जलतरणपटू बघितले असतील. मोठ्या चिकाटीने आणि वेगाने ते पोहतात. हिच चिकाटी आणि धाडस एका दीड वर्षाच्या बाळाने दाखवला आहे. सोशल मीडियावर या बाळाचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. यामध्ये हे बाळ उत्कृष्ट जलतरणपटू सारखे पाण्यात पोहत आहे. हा व्हिडिओ पाहून तुम्हालाही डोळ्यांवर विश्वास बसणार नाही.
@impresivevideo या ट्विटर हँडलने या चिमुकल्या बाळाचा व्हिडिओ शेअर केला आहे. ज्या वयामध्ये मुलांना बरोबर चालता येत नाही. त्या वयामध्ये हे १६ महिन्यांचे बाळ चांगले पोहत आहे. बाळ एक छोट्या स्विमिंगपूलमध्ये पोहत आहे. या बाळाने पुलाच्या एका टोकापासून ते दुसरा टोक सहज पोहत गाठला. बाळाला पाहून ते पोहण्यात निष्णात असल्याचेच वाटते.
(Viral stunt : भरधाव वाहनांनी धडक देण्यापूर्वीच तरुणाने घेतली उलटी उडी, नंतर थेट..)
पोहल्यानंतर हे बाळ स्विमिंगपूलमध्ये परत उडी मारते. १६ महिन्यांच्या वयात बाळाला आसपास काय घडतय याची फारशी जाण येत नसते, या वयात व्हिडिओतील हे बाळ चक्क पोहत आहे. पोहताना या बाळाच्या चेहऱ्यावर कसलीही भिती दिसून येत नाही. उलट ते आनंदाने पोहत आहे.
या व्हिडिओला २४ हजारांपेक्षा अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. व्हिडिओला अनेक लोकांनी लाईक केले आहे. या बाळाच्या पोहण्याच्या कौशल्याचे नेटकरी कौतुक करत आहेत. हा व्हिडिओ खरच आश्चर्यचकित करणारा आहे. इंटरनेवर सध्या असे चकित करणारे व्हिडिओ मोठ्या प्रमाणात दिसून येत आहेत.