उत्तर कोरियाच्या हुकूमशाही राजवटीमध्ये आणि कडक कायद्यांबाबत साऱ्या जगाला माहित आहे. पण प्रत्येकवेळी काहीतरी नवीन माहिती समोर आली की सर्वांनाच धक्का बसतो. सध्या असेच काहीसे पुन्हा एकदा उत्तर कोरियामध्ये घडले आहे. त्याचे झाले असे की, एका अल्पवयीन मुलांना टिव्ही मालिका पाहण्यासाठी भयंकर शिक्षा देण्यात आली आहे. टिव्ही मालिका पाहण्यासाठी शिक्षा का दिली जात असावी? चला सविस्तर जाणून घेऊ या…
उत्तर कोरिया आणि दक्षिण कोरिया यांच्यातील वाद सर्वानाच माहित आहे. दक्षिण कोरियामधील टिव्ही मालिका पाहत असल्यामुळे उत्तर कोरियाच्या दोन मुलांना ही शिक्षा देण्यात आली आहे. उत्तर कोरियाच्या मुलांना K-Drama( कोरिअन ड्रामा) पाहताना पकडण्यात आले. K-Drama पाहणाऱ्या ‘या’ १६ वर्षाच्या मुलांना १२ वर्ष सक्त मजुरीची शिक्षा देण्यात आली आहे.
उत्तर कोरियामध्ये दक्षिण कोरियाचे मनोरंजक कार्यक्रम पाहण्यासाठी बंदी
बीबीसीच्या व्हिडीओनुसार, “राखाडी गणवेशातील दोन मुले एका मंचावर त्यांना दिलेली शिक्षा दिली जात आहे. या मंचाला शेकडो लोकांनी वेढलेल्याचे व्हिडीओमध्ये दिसते आहे.” . खरं तर २०२० मध्ये हर्मिट किंगडमने लागू केलेल्या कायद्यानुसार, उत्तर कोरियामध्ये दूरदर्शन कार्यक्रमांसह दक्षिण कोरियाच्या सर्व प्रकारच्या मनोरंजक कार्यक्रमांवर बंदी घातली आहे. याचा अर्थ असा की, येथे दक्षिण कोरियन मनोरंजन पाहण्यासाठी किंवा शेअर करण्यासाठी मृत्यूदंड देखील होऊ शकते. मात्र शेजारील देशाची झलक पाहण्यासाठी काही लोक अजूनही आपला जीव धोक्यात घालण्यास घाबरत नाहीत.
हेही वाचा – वर्दीतल्या माणुसकीला सलाम! पोलिस कर्मचाऱ्याच्या ‘त्या’ कृतीने जिंकले नेटकऱ्यांचे मन! Viral Video एकदा पाहाच!
या तरुणांना सक्त मजुरीची शिक्षा देताना, “कळसूत्री बाहुल्यांची (कठपुतळी) राजवटीची संस्कृती किशोरवयीन मुलांपर्यंत पसरली आहे.तो फक्त १६ वर्षांचा आहे, पण त्याने त्याचे भविष्य उद्ध्वस्त केले आहे.” असे म्हटले होते. दोन्ही किशोरवयीन मुलांसाठी ही शिक्षा अत्यंत कठोर आहे. पण त्यांना फाशीची शिक्षा देण्यात आलेली नाही हे त्यांचे भाग्यच म्हणावे लागेल.
एका उत्तर कोरियाच्या व्यक्तीने बीबीसाला माहिती देताना सांगितले की, जर उत्तर कोरियाच्या नागरिकांना अमेरिकेच्या मनोरंजक मालिका पाहताना पकडले तर थोडे पैसे देऊन वाचता येऊ शकते पण दक्षिण कोरियाचे मनोरंजक कार्यक्रम पाहताना पकडले तर परिणाम अत्यंत भयानक असू शकतात. एखाद्या थेट गोळी मारली जाऊ शकते. उत्तर कोरियासाठी कोरिअन ड्रामा एक नशा आहे जी त्यांना कठोर वास्तवापासून दूर घेऊन जाते.
हेही वाचा – पायावर पाय ठेवून, हात सोडून बेधडकपणे बुलेट चालवत आहेत सरदारजी! Viral Video पाहून डोळ्यांवर विश्वास बसणार नाही
पण असे का? कारण कोरियन ड्रामा किंवा दक्षिण कोरियाच्या कार्यक्रमाची कौतूक करणारे काहीही असेल तर उत्तर कोरियाच्या प्रशासनासाठी एक मोठा धोका आहे. त्याचमुळे लोकांना एक धडा शिकवण्यासाठी अशी भयंकर शिक्षा दिली जाते. त्यांनी सांगितले की, उत्तर कोरियामध्ये, आम्हाला सांगितले जाते की, दक्षिण कोरिया आपल्यापेक्षा खूपच वाईट जगत आहे, परंतु जेव्हा लोक दक्षिण कोरियाची ड्रामा पाहतात तेव्हा त्यांना पूर्णपणे वेगळे जग दिसते. असे दिसते की, दक्षिण कोरियामध्ये सर्व काही छान आहे. उत्तर कोरियाच्या राजवटीला असा धोका पत्करायचा नाही.