17 Indians Kidnapped By Hamas: लाइटहाऊस जर्नालिज्मला इंटरनेटवर काही भारतीयांचे नावे असणारी यादी समोर व्हायरल होत असल्याचे दिसून आले. यामध्ये असा दावा केला जात होता की या यादीत १७ भारतीयांचा समावेश आहे ज्यांचे शनिवारी इस्रायलमधून हमासच्या दहशतवाद्यांनी अपहरण केले आहे. असा दावाही करण्यात आला की यापैकी १० जणांना ठार मारण्यात आले आहे. केंद्र सरकार, I.N.D.I.A. आघाडीतील पक्ष किंवा कोणीही या अपहरण केलेल्या भारतीयांबद्दल विधान करण्याची हिंमत केलेली नाही. मोर्चा काढून हमासच्या समर्थनार्थ बाहेर पडलेल्या एएमयूच्या विद्यार्थ्यांना युती पाठिंबा देत असल्याचा दावाही करण्यात आला.
काय होत आहे व्हायरल?
ट्विटर यूजर Sushil Dwivedi ने व्हायरल दावा आपल्या प्रोफाइल वर शेअर केला.
इतर वापरकर्ते देखील व्हायरल यादी शेअर करत आहेत.
तपास:
भारतीय नागरिकांच्या अपहरणाबद्दल काही बातम्या आहेत का ते शोधण्यापासून आम्ही आमचा तपास सुरू केला. आम्हाला एनडीटीव्हीवर भारतातील इस्रायली राजदूताचा एक व्हिडिओ सापडला ज्यामध्ये त्यांनी म्हटले की हमासने कोणत्याही भारतीयांचे अपहरण केले नाही.
आम्हाला इंडिया टुडे वर एक आर्टिकल सापडले, ज्यात असे म्हटले आहे की इस्रायलमध्ये राहणारे आणि काम करणारे १८,००० भारतीय सुरक्षित आहेत आणि युद्धाच्या काळात दूतावासाच्या संपर्कात आहेत.
त्यानंतर आम्ही यादीतील नाव शोधण्यास सुरुवात केली.
ही नावे नेपाळी नागरिकांची असल्याचे आम्हाला समजले. द काठमांडू पोस्टच्या वृत्तानुसार इस्रायलमधील दूतावासाला हमासच्या हल्ल्यात मारल्या गेलेल्या 5 नेपाळी विद्यार्थ्यांचे मृतदेह मिळाले आहेत.
इस्रायलमधील हमासच्या हल्ल्यात बेपत्ता झालेल्या बिपिन जोशी यांच्या संदर्भात लीगल रिसर्च सोसायटी नेपाळने परराष्ट्र मंत्रालयाचे लक्ष वेधल्याचे वृत्त हिमालयन टाईम्सने दिले आहे.
आम्हाला इकॉनॉमिक टाइम्स मधील एक रिपोर्ट देखील सापडला ज्यात म्हटले होते, किमान ७ नेपाळी जखमी झाले असून १७ जणांना इस्रायलमध्ये हमासने बंदिस्त केले आहे..
हे ही वाचा<< “तुम फिर हमसे छुपे रहो..”, कल्याण स्टेशनचं ‘ते’ दृश्य दाखवत मुंबई मध्य रेल्वेने दिली तंबी! ‘ही’ चूक कराल तर..
निष्कर्ष: हमासच्या दहशतवाद्यांनी १७ भारतीयांचे अपहरण केल्याचा दावा करणारी व्हायरल यादी दिशाभूल करणारी आहे. या यादीत नेपाळी नागरिकांचा उल्लेख आहे ज्यांचा मृत्यू झाला आहे, जखमी झाले आहेत किंवा हमासच्या दहशतवाद्यांनी कैद केले आहे. व्हायरल दावा खोटा आहे.