सोन्याचे दागिने, सोन्याचा पुतळा, सोन्याचे दात, सोन्याची फळे असे सोन्यापासून बनवलेल्या वेगवेगळ्या वस्तूंबदद्दल तुम्ही ऐकले असेल पण तुम्ही सोन्याच्या शौचालयाबद्दल ऐकले आहे का ? आता आपल्याकडे सोन्याचा जाऊ दे पण साधा शौचालय तरी कोणी बांधून दिला तरी मोठी गोष्ट म्हणावी लागेल सोन्याच्या शौचालयाची गोष्ट् तर दूरच राहिली. पण सध्या सोशल मीडियावर सोन्याच्या शौचालयाची चर्चा खूपच रंगली आहे.
अमेरिकेतल्या गुगेनहेम संग्रहालयात सोन्याचा कमोड ठेवण्यात आला आहे. आता संग्रहालयात हा सोन्याचा कमोड ठेवला आहे म्हटल्यावर तो केवळ आणि केवळ बघण्यासाठी असेल असे जर तुम्हाला वाटत असेल तर तो तुमचा गैरसमज आहे. हा कमोड सार्वजनिक वापरासाठी खुला करण्यात आला आहे. न्यूयॉर्क शहरात हे संग्राहलय आहे. आता हे शौचालय फक्त श्रीमंत लोक वापरू शकतात अशाप्रकारचेही कोणतेच बंधन नाही. या संग्राहलयाला भेट देणारा कोणताही व्यक्ती हे सोन्याचे शौचालय वापरू शकतो. १६ सप्टेंबर म्हणजेच आजपासूनच हे शौचालय सामान्य लोकांसाठी खुले करण्यात आले आहे विशेष म्हणजे हे सोन्याचे शौचालय वापरण्यासाठी जास्त पैसेही मोजावे लागणार नाही. जो कोणी संग्रहालयाची तिकिट काढेल त्याला ते वापरायला मिळणार आहे.
या संग्रहालयाच्या चौथ्या मजल्यावरील रेस्ट रुममध्ये हा सोन्याचा कमोड ठेवण्यात आला आहे. पुरुष आणि महिला दोघेही हे शौचालय वापरू शकतात. इटलीचे प्रसिद्ध आर्टिस्ट मौरिजियो कैटिलेन यांनी हा सोन्याचा कमोड तयार केला आहे. हा कमोड तयार करण्यासाठी किती खर्च आला हे मात्र सांगितले नाही. गेल्याच महिन्यात या संग्रहालयात हा कमोड आणण्यात आला होता. परंतु, तो जोडण्यासाठी मात्र अडचणी येत होत्या.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा