अनेक महिलांबरोबर रोज अशा काही घटना घडत असतात; ज्याचा कधी कोणी विचारही केला नसेल. मग अशा घटनांमुळे देशात महिला सुरक्षित आहे का, असा प्रश्न वारंवार उपस्थित केला जातो. रस्त्यावरून चालताना, बस, रेल्वे किंवा इतर गर्दीच्या ठिकाणी महिलांबरोबर काही वेळा अशी काही घटना घडते की, जी पाहून खरंच खूप धक्का बसतो. सध्या सोशल मीडियावर अशाच एका धक्कादायक घटनेचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर कोणाच्याही तळपायाची आग मस्तकात गेल्याशिवाय राहणार नाही.

एका १९ वर्षीय तरुणीने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून एक व्हिडीओ पोस्ट केलाय; ज्यात तिने तिचा एका दुकानात विनयभंग झाल्याचा दावा केला आहे. परंतु, इतके होऊनही संबंधित आरोपीवर कारवाई झाली नाही ही शरमेची बाब असल्याचे म्हणत संतापही व्यक्त करण्यात आलाय. तरुणीने या घटनेचा संपूर्ण व्हिडीओ यूट्यूबवरदेखील पोस्ट केला आहे; ज्यात तिने सांगितले की, ती एका दुकानात सामान घेण्यासाठी म्हणून गेली असता, तिथे एका व्यक्तीने मागून येऊन, तिला हात लावला. या घटनेनंतर तिने आरडाओरडा केला; पण तिच्यावर कोणाचाही विश्वास बसला नाही. ती नाटक करीत असल्याचे अनेकांना वाटले.

Cylinder explosion on a handcart in front of Shivajinagar court pune news
शिवाजीनगर न्यायालयासमोरील हातगाडीवर सिलिंडरचा स्फोट; तीनजण किरकोळ भाजून जखमी
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
Two youths attacked with a koyta in Khadki crime news Pune news
पुणे: खडकीत दोघा तरुणांवर कोयत्याने वार
Tanker accident shocking video goes viral on the internet truck and bike accident know in marathi
नशीबावर विश्वास नसेल तर ‘हा’ VIDEO पाहा; टँकरला धडकला, समोर मरण दिसलं पण पुढच्याच क्षणी काय घडलं पाहा
Kurla Bus Accident: Amid Probe, Viral Video Shows Another BEST Driver Buying Liquor From Wine Shop In Mumbai's Andheri shocking video viral
मुंबईत हे काय चाललंय? बेस्ट चालकाने बस थांबवली, वाईन शॉपवरुन दारु घेतली; कुर्ला अपघातानंतर दुसरा धक्कादायक VIDEO व्हायरल
fire broke out at scrap warehouse at Kudalwadi in Chikhli on Monday morning
पिंपरी : चिखलीतील गोदामांच्या आग प्रकरणी जागा मालकाचा शोध
massive fire breaks out at footwear shops in virar
विरारमध्ये चप्पल दुकानांना भीषण आग; आगीत तीन दुकाने जळून खाक
a student expressed about life after his father death
“अपघातात वडील वारले अन्…” चिमुकल्याने सांगितली व्यथा; विद्यार्थ्यांसह शिक्षकही रडले, पाहा VIRAL VIDEO

यावेळी त्यांनी दुकानात लावलेले सीसीटीव्ही कॅमेरे तपासण्याचे ठरविले. त्यानंतर पीडित तरुणीने पोलीस ठाणे गाठून पोलिसांना तो व्हिडीओ दाखविला. तसेच व्यवक्तीला मारा, असे म्हणत कडक कारवाईची मागणी केली. पण, पोलिसांनी हे प्रकरण गांभीर्याने न घेता, त्याला सोडून दिले, असा आरोप तरुणीने केला आहे.

‘ती’ मिठी ठरली शेवटची! पुराच्या पाण्यात अडकले अन् ‘असा’ झाला तीन जिगरी दोस्तांचा करुण अंत; काळीज पिळवटून टाकणारा VIDEO

तरुणीने तिच्या पोस्टमध्ये लिहिले की, १७ एप्रिल रोजी माझा विनयभंग झाला. या घटनेच्या वेळी आजूबाजूला उपस्थित असलेल्या लोकांनी कॅमेरा फुटेज दाखविल्याशिवाय माझ्यावर विश्वास ठेवला नाही आणि कोणीही कारवाई केली नाही. त्यावर मीच आवाज उठवला, हे फार लज्जास्पद आहे. जेव्हा कॅमेरा फुटेज पाहिले तेव्हा व्यक्ती हळूहळू पळून जाण्याचा प्रयत्न करू लागला आणि मी ओरडत राहिले. लोकांना त्याला थांबविण्याची विनंती केली; पण एकाही व्यक्तीने त्याला थांबवले नाही. त्या माणसाला बायको आणि एक मुलगी आहे हे जाणून मला आश्चर्य वाटले. बरेच काही घडले; जे मला सार्वजनिकरीत्या शेअर करता येणार नाही.

तरुणीने पुढे लिहिले, “मी अत्यंत निराश आहे. मी स्वत:ला कमजोर समजत आहे. मला खेद वाटतो की, मी मदतीसाठी ओरडत असताना काही गोष्टी घडल्या. या सगळ्याबद्दल बोलणंही खूप विचित्रआहे. दरम्यान, तरुणीची ही पोस्ट आता सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. अनेक युजर्सनी त्या व्यक्तीच्या कृत्यावर तीव्र संताप व्यक्त केला. अनेक जण त्या तरुणीच्या समर्थनार्थ सपोर्ट करीत कमेंट करीत होते.

(ही बातमी सोशल मीडिया वापरकर्त्यांच्या दाव्यांवर आधारित आहे. लोकसत्ता.डॉट कॉम या दाव्याची पुष्टी करीत नाही.)

Story img Loader