बल्गेरियात जन्मलेल्या बाबा वेंगाच्या भविष्यवाण्यांची अनेकदा चर्चा होते आणि आतापर्यंत त्यांची अनेक भविष्यवाणी खरी ठरली आहे. आता सध्याच्या युगामध्ये बाबा वेंगासारखी भविष्यवाणी सांगणारी एक मुलगी चर्चेत आहे. तिला सर्वजण नव्या युगातील बाबा वेंगा म्हणत आहेत. हॅना कॅरोल या १९ वर्षांच्या मुलीने २०२२ या वर्षासाठी २८ मोठ्या भविष्यवाण्या केल्या होत्या, त्यापैकी १० भविष्यवाण्या आतापर्यंत खऱ्या ठरल्या आहेत.
हॅना कॅरोलची ‘या’ भविष्यवाण्या खऱ्या ठरल्या आहेत
अमेरिकेतील मॅसॅच्युसेट्स येथे राहणारी हॅना कॅरोल केवळ १९ वर्षांची असली तरी ती तिच्या भविष्यवाण्यांमुळे नेहमीच चर्चेत असते. हॅना कॅरोल हिने २०२२ च्या सुरुवातीला राणी एलिझाबेथ यांच्या मृत्यूची भविष्यवाणी केली होती, जी खरी ठरली आहे. या वर्षाच्या जानेवारीमध्ये हॅनाच्या भविष्यवाण्यांमध्ये किम कार्दशियनचा ब्रेकअप, हॅरी स्टाइल्स आणि बियॉन्सेचा नवीन अल्बम, रिहाना आणि प्रियांका चोप्रा यांच्या आई बनण्याचा समावेश होता.
( हे ही वाचा: ऐकावे ते नवलच! ऑनलाइन लुडो खेळताना जुळले प्रेम; मुलगी लग्नासाठी थेट पोहोचली यूपीमध्ये)
हॅना कॅरोलच्या या भविष्यवाण्यांवर एक नजर टाका
डेली स्टारच्या रिपोर्टनुसार, हॅना कॅरोलच्या बहुतेक भविष्यवाण्या पॉप कल्चर किंवा सिनेमा इंडस्ट्रीशी संबंधित आहेत. २०२२ साठी हॅनाच्या भविष्यवाणीच्या यादीमध्ये केंडल जेनरचा साखरपुडा, हेली बीबर गरोदर असणे, टायलर स्विफ्टच्या लग्न किंवा साखरपुड्याची घोषणा, वन डायरेक्शन बँडचे पुनर्मिलन यांचा समावेश आहे.
हॅनाला सर्वजण नवीन काळातील बाबा वेंगा म्हणत आहेत
बल्गेरियाच्या बाबा वेंगा यांनी विसाव्या शतकात अनेक भविष्यवाण्या केल्या आणि आता लोक हॅना कॅरोलला एकविसाव्या शतकातील बावा वेंगा म्हणत आहेत. जिने आतापर्यंत अनेक भविष्यवाणी केली आहे. हॅना म्हणते की तिला पॉप कल्चर आणि सिनेइंडस्ट्रीत जास्त रस आहे, म्हणूनच तिचे बहुतेक भविष्यवाण्या या क्षेत्राशी संबंधित असतात. यंदा तिचे कोणतेही भाकीत खरे ठरले नाही, तर येत्या काही वर्षांत ते नक्कीच खरे ठरेल, असे हॅना म्हणते.