Independence Day 1947 Video: लाखो प्राणांचे बलिदान दिल्यानंतर १४ ऑगस्ट १९४७ च्या मध्यरात्री भारताला ब्रिटिशांकडून स्वातंत्र्य मिळाले. राजधानी दिल्लीत स्वातंत्र्य दिनाचा जल्लोष साजरा केला जात होता. जवाहरलाल नेहरू यांनी स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने संसदेच्या संविधान सभेत ‘ट्रिस्ट विथ डेस्टिनी’ (नियतीशी करार) हे अजरामर भाषण दिले. आज ७६ वर्षांनी आपण स्वातंत्र्यांचा देखणा सोहळा पुन्हा साजरा करत आहोत. आजच्या मॉडर्न जगात प्रत्येक गोष्टीचं लाईव्ह स्ट्रीमिंग होत असताना घरबसल्या आपण दिल्लीत लाल किल्ल्यावर होणारं मोदींचं भाषण ऐकू शकता. महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यापासून ते जगाच्या उच्च टोकापर्यंत सर्वत्र साजरा होणारा स्वातंत्र्य दिनाचा सोहळा आपणही अनुभवू शकणार आहात. पण याच तंत्रज्ञानाच्या मदतीने आपण भूतकाळातही आज डोकावून पाहणार आहोत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

भारताचा पहिला वाहिला स्वातंत्र्य दिन सोहळा, अंगावर शहारा आणणारं जवाहरलाल नेहरूंचं ते भाषण आणि पहिल्यांदा जेव्हा असंख्य जनसमुदायाने ‘जन- गण- मन’ची धून ऐकली तो क्षण आपण आज पुन्हा एकदा अनुभवुया…

भारत स्वातंत्र्य झाल्याची घोषणा (Independence Announcement)

भारताचा स्वातंत्र्य दिन सोहळा, १९४७ (First Independence Day Celebration, 1947)

नेहरूंचं ‘ट्रिस्ट विथ डेस्टिनी’ भाषण (Tryst With Destiny Speech)

हे ही वाचा << स्वातंत्र्य दिनाच्या मराठी शुभेच्छा देणाऱ्या चारोळ्या; Whatsapp Status, Facebook वर शेअर करून व्यक्त करा देशप्रेम

तुम्हा सर्व वाचकांना लोकसत्ता परिवारातर्फे स्वातंत्र्य दिनाच्या अनेकानेक शुभेच्छा! भारतीय स्वातंत्र्यदिन चिरायू होवो!

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 1947 independence day first celebration video jawaharlal nehru tryst with destiny speech independent india announcement svs