India-Pakistan Railway Ticket Viral News : भारत-पाकिस्तान देशाच्या संबंधित अनेक गोष्टींबद्दल जाणून घेण्यासाठी लोकांची उत्सुकता शिगेला पोहोचलेली असते. भारत-पाकिस्तान क्रिकेट सामना असो वा सीमेवरील चकमक, या घडामोडींविषयी बातम्या वाचणं लोकांना आवडतं. विशेष म्हणजे भारत-पाकिस्तान क्रिकेट सामना पाहण्यासाठीही लाखोंच्या संख्येत क्रिकेटप्रेमी स्टेडियममध्ये बसलेले दिसतात. अशातच आता भारत-पाकिस्तानच्या एका नव्या गोष्टीमुळं चर्चेला तोंड फुटलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

गेल्या काही दिवसांपासून गाड्यांचे जुने बिल सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतात. आताही एका जुन्या रेल्वे तिकिटाच्या व्हायरल पोस्टने सर्वांचे लक्ष वेधून घेतलं आहे. आश्चर्याचा बाब म्हणजे हे रेल्वे तिकिट भारत देशाच्या स्वातंत्र्य काळातील आहे. भारत-पाकिस्तानचं हे रेल्वे तिकिट १९४७ चे आहे. त्यावेळी नऊ प्रवाशांनी पाकिस्तानच्या रावलपिंडी येथून अमृतसरला जाण्यासाठी हे तिकिट काढलं होतं.

व्हायरल झालेल्या तिकिटाचे दर पाहून सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. त्यावेळी ९ लोकांसाठी रेल्वेचे तिकिट दर फक्त ३६ रुपये होते. या जून्या रेल्वे तिकिटाला पाकिस्तानच्या रेल लवर्स नावाच्या एका फेसबुक पेजवर शेअर केलं आहे. पाकिस्तान रेल लवर्सने तिकिटाचं फोटो शेअर करुन म्हटलंय, “१७-०९-१९४७ ला स्वातंत्र्यानंतर ९ लोकांसाठी दिलेल्या एका रेल्वे तिकिटाचा फोटो..रावलपिंडी ते अमृतसरसाठी, ज्याची किंमत ३६ रुपये ९ पैसे आहे. भारतात आलेल्या एका कुटुंबियांचं हे रल्वे तिकिट असण्याची शक्यता आहे. हे रेल्वे तिकिट थर्ड एसी क्लासचं असल्याने, या तिकिटाची किंमत पाहून सर्वच थक्क झाले आहेत.

नक्की वाचा – video : समोरच्या झाडावर मोठी झेप घेऊन बिबट्याने माकडावर मारला पंजा, शिकारीचा थरार कॅमेरात कैद

भारत-पाकिस्तान रेल्वे प्रवास करण्यासाठी एका प्रवाशाला ४ रुपयांचं तिकिट काढावं लागत होतं, अशी माहिती व्हायरल झालेल्या या तिकिटावरून समोर आली आहे.हे तिकिट १७ सप्टेंबर १९४७ चं असल्याचं या व्हायरल झालेल्या फोटोत दिसत आहे. या तिकिटावर सर्व माहिती पेनाने लिहिली आहे. त्यावेळी तिकिट छापण्यासाठी कोणत्याही प्रकारच्या संगणकाची उपल्बधता नव्हती. त्यावेळी तिकिटावर सर्व माहिती पेनानेच लिहिली जायची. फाळणीच्या आधी उत्तर पश्चिम रेल्वे झोन पाकिस्तानमध्ये होता. या तिकिटाचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या तिकिटाचं दर पाहून नेटकऱ्यांनी आश्चर्य व्यक्त केलं आहे.