तामिळनाडूत एक आगळीवेगळी घटना घडल्याने सर्वत्र आश्चर्य व्यक्त केले जात आहे. गांजाची तस्करी करणाऱ्या दोन आरोपींना चेन्नईच्या मरीना पोलिसांनी अटक केली होती. आरोपींकडून जप्त केलेला २२ किलो गांजा पोलिसांनी स्टोर रुममध्ये ठेवला होता. मात्र, पोलिसांच्या स्टोर रुममध्ये ठेवलेला २२ किलो गांजा उंदरांनी खाल्ल्याने एकच खळबळ उडाली. उंदारांमुळे गांजा गायब झाल्याचा दावा पोलिसांनी न्यायालयात सुनावणी दरम्यान केला. न्यायालयात या प्रकारणाच्या सुनावणी सुरु असताना पोलिसांनी झालेल्या प्रकाराची माहिती न्यायालयात सादर केली. मात्र, २१.९ किलोग्रॅम गांजा उपलब्ध नसल्याने पोलिसांना आरोपपत्रात दाखल केलेला गांजा न्यायालयात सादर करता आला नाही. त्यामुळे राजागोपाल आणि नागेश्वरा राव यांची न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

याबाबत सविस्तर वृत्त असं की, २२ किलो गांज्याच्या तस्करी प्रकरणात चेन्नईच्या मरीना पोलिसांनी २०२० मध्ये राजागोपाल आणि नागेश्वरा राव यांना अटक केली होती. त्यानंतर मंगळवारी या आरोपींना न्यायालयात हजर करण्यात आले होते. परंतु, उंदरांनी गांजा खाल्ला असल्याची माहिती पोलिसांनी न्यायालयात दिली. या प्रकरणाची सुनावणी विशेष एनडीपीएस कोर्टात (special Narcotic Drugs and Psychotropic Substances court ) झाली.

नक्की वाचा – नर्ससोबत शारीरिक संबंध करताना रुग्णाला आला हार्ट अटॅक, जीव गेल्यानंतर रुग्णालयात घडलं भयंकर

पोलिसांनी या सुनावणी दरम्यान आरोपींकडून जप्त केलेला ५० ग्रॅम गांजा सादर केला आणि ५० ग्रॅम गांजा फॉरेन्सीक लॅबमध्ये पाठवण्यात आल्याची माहिती दिली. परंतु, न्यायालयाने उर्वरीत २१.९ किलो गांजाबाबत विचारले असता, तो गांजा उंदरांनी खाल्ला असल्याचं पोलिसांनी सांगितलं. आरोपपत्रात दाखल केलेल्या गांजा पोलिसांना न्यायालयात सादर न करता आल्याने आरोपी राजागोपाल आणि नागेश्वरा राव यांची न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 2 accused were acquitted by the court as rats ate 22 kg marijuana in police store room tamilnadu crime update nss
Show comments