समाज माध्ममांवर सध्या अवाक करणारे व्हिडिओज व्हायरल होत आहे. कुठे ८२ वर्षांचे आजोब तरुणांसारखे उत्साहात नाचताना दिसत आहेत, तर कुठे एका तरुणावरून ट्रेन जाते, मात्र तो सुखरूप दिसून येतो. अशाच प्रकारचा एक थक्क करणारा व्हिडिओ व्हायरल झालेला आहे. हा व्हिडिओ तुमच्या अंगावर काटा आणेल.
हा व्हिडिओ एका सलूनचा आहे. यात एक व्यक्ती खुर्चीवर बसलेली आहे. न्हावी या व्यक्तीकडे हेअर ड्रायर घेऊन येतो व त्यास वापरू लागतो, मात्र या दरम्यान अचानक हेअर ड्रायरमध्ये जोरदार स्फोट होतो आणि संपूर्ण दुकानात आगीचा भडका उडाल्याचे दिसून येते.
हेअर ड्रायरमधून निघालेली आग संपूर्ण दुकान व्यापून टाकते. खुर्चीवर बसलेली व्यक्ती आणि न्हावी हे दोघेही या आगीत सापडतात. हा व्हिडिओ वोसा टीव्हीने ट्विटरवर शेअर केला आहे. या घटनेत दोन्ही व्यक्ती जखमी झाली आहेत. ही घटना कुठे घडली याची माहिती नाही. आदित्य तिवारी यांनी या घटनेचा व्हिडिओ ट्विटरवर शेअर केला आहे.
ही भयंकर घटना कशी घडली हे अद्याप स्पष्ट नाही. मात्र घटनेचा व्हिडिओ प्रचंड व्हायरल झालेला आहे. व्हिडिओवर नेटकऱ्यांनी प्रतिक्रिया देखील दिली आहे. एकाने ‘मशीन न हुई, हँड ग्रेनेड हो गई’ अशी कमेंट करत चिंता व्यक्त केली आहे. हा व्हिडिओ पाहून आता हेअर ड्रायर वापरताना लोक नक्कीच सुरक्षेचा विचार करतील.
(शर्यतीच्या सुरूवातीलाच ती अडखळली पण…; नेटकऱ्यांना भावलेला Viral Video एकदा पाहाच)