लहान मुलांना खेळताना एकटे सोडू नये हेच खरे! ही मूलं काय करतील याचा नेम नाही. म्हणून सगळ्या पालकांसाठी सतर्कतेचा इशारा म्हणून हा व्हिडिओ व्हायरल होत आहे. खेळता खेळता यातला दोन वर्षांच्या चिमुकल्यावर कपाट पडते कितीतरी वेळ हे मूल वेदनेने कपाटाखाली कळवळत होते, शेवटी प्रसंगावधानता दाखवत त्याच्या जुळ्या भावाने या मुलाला कपाटाखालून बाहेर काढले. या मुलांच्या घरात असलेल्या सीसीटीव्ही कॅमेरात हे दृश्य कैद झाले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

वाचा : ऐकावे ते नवलच! २०१७ मध्ये निघालेले विमान २०१६ ला पोहोचले

अमेरिकेमधल्या उटाह भागात राहणा-या एका फेसबुक युजरने एक व्हिडिओ शेअर केला आहे. दोनवर्षांची जुळी भावंडं आपल्या खोलीत खेळत आहेत. त्यातल्या एकाने खण उघडून त्यात चढण्याचा प्रयत्न केला. दुस-यानेही त्याचे अनुकरण केले पण यात कपाट एका बाजूला कलंडले आणि त्यातल्या एका मुलाच्या अंगावर पडले. हे छोटे मूल वेदनेने कळवळून रडत होते. पण त्याचबरोबर या मुलाने कपाटातून बाहेर येण्याचा प्रयत्नही केला. पण वजनामुळे त्याला काहीच करता येईना. शेवटी त्याच्या जुळ्या भावाने प्रसंगावधानता दाखवत आपल्या भावाला कपाटाखालून बाहेर काढले. पण त्या चिमुकल्याला सुचले नसते तर मात्र याचे परिणाम गंभीर झाले असते. हे मुल मात्र याबाबात सुदैवी ठरले. असाच प्रसंग कोणाच्याही घरी घडू नये यासाठी वडिलांनी सीसीटीव्ही फूटेज सोशल मीडियावर शेअर केले आहे.