Huge Python Viral Video : जंगलातील दुनियेत कधी कुणाची शिकार होईल, हे सांगता येणार नाही. सोशल मीडियावर नेहमीच रानावनात भटकणाऱ्या प्राण्यांचे व्हिडीओ व्हायरल झालेले दिसतात. एखादा प्राणी दुसऱ्यांची शिकार करतो, तर कधी दुसऱ्या प्राण्यांच्या हल्ल्यात स्वत:च शिकार होतो. अनेकदा वन्यप्राणी जंगलात भटकताना दिसतात. तसंच सरपटणारे सापही त्यांची शिकार शोधायला जंगल सफारी करताना दिसतात. एका जगंलात अशाच प्रकारचा विशाल अजगर जमिन खोदताना आढळून आला. बुलडोझर जमिनीचं खोदकाम करत असताना २० फुटांचा भलामोठ्या अजगराने विळखा घालून समोर दिसल्याचं एका व्हायरल झालेल्या व्हिडीओत दिसत आहे. अजगराचा व्हिडीओ पाहून अनेकांचा थरकाप उडाल्याशिवाय राहणार नाही. कारण माणूस समजून अजगराने बुलडोझरवर हल्ला चढवल्याचं या व्हिडीओत दिसत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अन् विशाल अजगराने जेसीबीवरच हल्ला चढवला, थरकाप उडवणारा व्हिडीओ व्हायरल

अंगावर काटा आणणाऱ्या या व्हिडीओत एक महाकाय अजगर बुलडोझरवर हल्ला करताना दिसत आहे. व्हिडीओत दिसणारा महाकाय अजगर भला मोठा असल्याने त्याला पकडताना माणसांच्याही नाकी नऊ आले असते, असंच म्हणता येईल. जंगलात २० फूट लांबीचा आणि जवळपास १०० किलो वजनाचा हा अजगर बुलडोझरवर दंश करताना दिसतोय. या जंगलात हा अजगर फिरत असल्याचं स्थानिक नागरिकांनी पाहिलं होतं. त्यानंतर या अजगराला बुलडोझरच्या साहय्याने बाहेर काढण्यात आल्याचं व्हिडीओत दिसत आहे.

नक्की वाचा – Video: सासरी निघालेल्या नवरीला थांबवलं, कुत्र्याचं प्रेम पाहून नवरीही ढसाढसा रडली, ‘हा’ क्षण नेटकऱ्यांची मनं जिंकतोय

इथे पाहा व्हिडीओ

हा थरारक व्हिडीओ wild_animal_pix नावाच्या इन्स्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओला पाहून नेटकऱ्यांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. जेसीबीच्या मदतीने अजगराला बाहेर काढला, त्यावेळी तो अर्धा जमिनीवर आणि अर्धा हवेत लटकताना या व्हिडीओत दिसत आहे. या व्हिडीओला आतापर्यंत एक हजारांहून अधिक लाईक्स मिळाले आहेत. व्हिडीओ पाहिल्यानंतर नेटकऱ्यांनी भन्नाट प्रतिक्रियांचा वर्षावही केला आहे. अजगर साप जंगलता किंवा मानवी वस्तीत दिसल्यास सर्पमित्र अशा सापांना पकडून वन विभागाच्या ताब्यात देतात. अजगराच्या विळख्यात मोठ मोठ्या प्राण्यांची शिकार झाल्याचे व्हिडीओही इंटरनेटवर व्हायरल झाले आहेत. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर अनेकांच्या अंगावर शहारे आल्याशवियार राहणार नाहीत.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 20 feet huge python found in forest giant python attacked bulldozer people shocked after watching viral video nss