Ram And Lotus On Coins Made 200 Years Ago: राम मंदिराच्या अभूतपूर्व सोहळ्यापूर्वी लाइटहाऊस जर्नालिज्मला विविध सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर मोठ्या प्रमाणावर शेअर केली जात असलेली पोस्ट आढळून आली. पोस्टमध्ये नमूद केले आहे की या चित्रात २०० वर्षांपूर्वी इंग्रजांनी बनवलेले हे नाणे दिसतेय. ज्यामध्ये एका बाजूला कमळ आणि दुसऱ्या बाजूला भगवान रामाचे सीता- लक्ष्मण व हनुमानासह चित्र आहे. राममंदिर ‘कमळवालेचं’ बांधणार हे इंग्रजांनाही माहीत होते, असा उल्लेख या पोस्टमध्ये केलेला आहे. मराठीत असणारी ही पोस्ट मोठ्या प्रमाणात शेअर केली जात आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

काय होत आहे व्हायरल?

फेसबुक यूजर ललिता पाटीलने व्हायरल पोस्ट आपल्या प्रोफाइल वर शेअर केली.

इतर वापरकर्ते देखील असाच दावा करत पोस्ट शेअर करत आहेत.

तपास:

आम्ही गूगल रिव्हर्स इमेज सर्चद्वारे आमचा तपास सुरू केला आणि आम्हाला फ्लिपकार्ट या ईकॉमर्स वेबसाइटवर नाण्याची इमेज शेअर केली गेली असल्याचे समजले. डिस्क्रिप्शन मध्ये लिहले होते: COINS WORLD 1818 TWO ANNA 250 GRAMS SUPER HEAVY RAM DARBAR TOKEN Ancient Coin Collection (1 Coins)

https://www.flipkart.com/coins-world-1818-two-anna-250-grams-super-heavy-ram-darbar-token-ancient-coin-collection/p/itm99c084b292ba5

तपासाच्या पुढील टप्प्यात, आम्ही प्राचीन भारतीय नाण्यांचा शोध घेतला आणि IndianCoins.com नावाची वेबसाइट सापडली. संकेतस्थळावर अनेक नाण्यांचे संदर्भ व फोटो आढळून आले.

आम्ही फोनवरून इंडियनकॉइन्सचे सुलतान यांच्याशी संपर्क साधला आणि व्हायरल इमेजबद्दल चौकशी केली. त्यांनी माहिती दिली की अशी नाणी काल्पनिक संग्रहातील आहेत आणि ती खरी नाहीत. व्हायरल झालेले नाणे बनावट असून ते ब्रिटिशकालीन नाही. आम्ही आरबीआयची वेबसाइटवर ठराविक कालावधीतील भारतीय नाण्यांचे फोटो सुद्धा तपासून पाहिले.

https://www.rbi.org.in/Scripts/restrospectcoins.aspx

आम्ही आरबीआयच्या वेबसाइटवर चलन संग्रहालय सुद्धा तपासले त्यावर अशी कोणतीही नाणी आढळली नाहीत.

https://www.rbi.org.in/Scripts/mc_british.aspx

वेबसाइटने नमूद केले आहे की, ‘पश्चिम भारतातील नाणी ही मुघल व इंग्रजांच्या शैलीत विकसित होत गेली. १७१७ मध्ये इंग्रजांनी सम्राट फारुखसियारकडून मुघलांची नाणी ‘बॉम्बे टांकसाळीत’ बनवण्याची परवानगी मिळवली. बॉम्बे टांकसाळीत इंग्रजी पॅटर्नची नाणी बनू लागली. सोन्याच्या नाण्यांना कॅरोलिना, चांदीची नाणी अँग्लिना, तांब्याची नाणी कपपेरून आणि कथील नाणी टिनी म्हणून ओळखली जाऊ लागली. १८३० च्या सुरुवातीस, इंग्रज भारतात प्रबळ सत्ताधारी बनले होते. शंभर वर्षांच्या अशांततेनंतर एका प्रबळ सत्तेच्या उदयामुळे १८३५ चा नाणेबंदी कायदा लागू झाला आणि एकसमान नाणे जारी करणे शक्य झाले.’

१८१८ च्या नाण्यांच्या एका बाजूला कमळ होते किंवा ती भगवान रामाला समर्पित होती असा उल्लेख मजकुरात कुठेही नाही.

निष्कर्ष: १८१८ मध्ये इंग्रजांनी एका बाजूला कमळ आणि एका बाजूला भगवान रामाचे चित्र असल्याचे नाणी बनवले नाहीत. अशी नाणी भारतातील चलनाचा भाग कधीच नव्हती.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 200 ago old coins with ram and lotus image shows britishers belives only lotus supporter bjp to make ram mandir reality check svs