जगभरामध्ये विचित्र लोकांची काही कमतरता नाही. आपल्या विचित्र कामगिरीमुळे हे लोक नेहमी चर्चेत असतात. अनेक लोक नाईलाज असल्याने असे काहीतरी कृत्य करतात कर काही लोक मुद्दाम अशी कामगिरी करतात ज्यामुळे ते नेहमी चर्चेत राहू शकतील. सध्या अशाच एका २२ वर्षीय मुलीची जिने गेल्या काही वर्षांपासून अंघोळच केली नाही. म्हणजे अंघोळ करण्यासाठी कंटाळा करणारे लोक तुम्ही आसपास नेहमी पाहिले असतील. काही लोक २-३ दिवसातून एकदा अंघोळ करतात. पण अंघोळच करत नाही अशी व्यक्ती क्वचितच तुम्हाला महित असेल. ही २२ तरुणी अंघोळच करत नाही म्हणून सध्या चर्चेत आली आहे. तरुणीच्या अंघोळ न करण्यामागे असे काय कारण आहे ते जाणून घ्या

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

खरं तर या २२ वर्षीय मॉन्टेफुस्को नावाच्या तरुणीला पाण्याची अॅलर्जी आहे त्यामुळे ती अंघोळच करत नाही. न्युयॉर्क पोस्टच्या वृत्तानुसार, युएसएमधील साऊय कॅरोलिना येथे राहणारी मॉन्टेफुस्को ही एका गंभीर आजाराने ग्रस्त आहे. जेव्हा तिला तिच्या शरीराबाबत काहीतरी विचित्र गोष्टी जाणवू लागल्या तेव्हा ती डॉक्टरांकडे गेली आणि तिथे गेल्यानंतर तिला आरोग्याच्या समस्येबद्दल कळले. तेव्हा तिचे फक्त १२ वर्ष होते.

काय अडचण आहे

खरं तर, मॉन्टेफुस्को एका आजाराने ग्रस्त आहे ज्यामध्ये आंघोळ केल्यानंतर तिच्या अंगाला तीव्र खाज सुटते आणि लहान पुरळ उठतात. मॉन्टेफुस्कोने सांगितले की, “जेव्हा ती अंघोळ करताना किंवा इतर कोणत्याही प्रकारे पाण्याच्या संपर्कात येते तेव्हा तिच्या त्वचेला खूप खाज सुटते आणि हा त्रास हळूहळू वाढत जातो. आंघोळीनंतर स्क्रबिंग आणि शेव्हिंग करताना ती हवेच्या संपर्कात येताच हा त्रास वाढतो.\

हेही वाचा – केरळच्या शाळेत विद्यार्थ्यांना शिकवणार देशातील पहिली AI शिक्षिका; ‘Iris’ची काय आहे खासियत, जाणून घ्या

अंघोळ न करता ही तरुणी स्वतःला स्वच्छ कसे ठेवते?

मॉन्टेफुस्कोने सांगितले की, तिला आंघोळ न केल्याचा पश्चात्ताप होतो पण तिला तसे करण्यास भाग पाडले जाते. अंघोळ केल्याने तिचा त्रास आणखी वाढतो. स्वतःला स्वच्छ ठेवण्यासाठी ती ड्राय शॅम्पू आणि बॉडी वाइप्स वापरते.

हेही वाचा – एलॉन मस्क नव्हे आता ‘ही’ आहे जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती; टेस्ला सीईओची दुसऱ्या स्थानावर का झाली घसरण?

सोशल मीडियावरून मदत मिळाली

मॉन्टेफुस्कोने सांगितले की, जेव्हा तिने सोशल मीडियावर तिच्या समस्येबद्दल शोध घेतला तेव्हा त्यांना इतर लोकांबद्दल माहिती मिळाली ज्यांना पाण्याची ऍलर्जी आहे आणि त्यांनीही बऱ्याच काळापासून आंघोळ केलेली नाही. हे कळल्यानंतर तिला स्वतःबद्दल वाईट वाटले. आतापर्यंत, वैद्यकीय साहित्यात या प्रकारच्या आरोग्य समस्येची केवळ ३७ प्रकरणे नोंदवली गेली आहेत, त्यापैकी मॉन्टेफुस्को एक आहे. या समस्येवर कोणताही उपचार नाही.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 22 year old girl has not bathed for years reason will shocked you what happens when she touches water snk
Show comments