Yogi Meditation on Snow Video: बर्फाच्छादित शिखरांमध्ये ध्यानात मग्न असलेल्या एका योगीपुरुषाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये आपण पाहू शकता की या पुरुषाचे केस, दाढी, शरीर पूर्णपणे बर्फाने झाकलेले आहे. बघता क्षणी हा व्हिडीओ आपल्याला इतका थक्क करून जातो की छे, हे शक्यच नाही, एडिटिंग केलेलं आहे असाच पहिला विचार डोक्यात येतो. पण थांबा एरवी एडिटिंगच्या बाबत खरा ठरणारा अंदाज या व्हिडिओच्या बाबत पूर्ण चुकीचा आहे. हा व्हिडीओ पूर्णतः खरा असून यात दिसणारे योगी पुरुष खरोखरच बर्फावर बसून ध्यानसाधना करत आहेत. प्राप्त माहितीनुसार हे दृश्य हिमाचल प्रदेशच्या कुल्लू येथील सेराज खोऱ्यातील आहे.
साधारण फेब्रुवारी महिन्याच्या सुरुवातीला व्हायरल झालेल्या या व्हिडिओमध्ये दिसणाऱ्या योगीपुरुषाचे नाव सत्येंद्र नाथ असे आहे. बंजार येथील रहिवासी असलेले सत्येंद्र नाथ गेल्या २० ते २२ वर्षांपासून कौलांतक पीठ आश्रमात योगाभ्यास करत आहेत. नाथांचे गुरू, इशनाथ, हे हिमालयी योग परंपरेचे अनुयायी होते त्यांच्यावरून सत्येंद्र नाथ यांना सुद्धा त्यांच्या अनुयायांमध्ये इशपुत्र म्हणून ओळखले जाते. इशपुत्र हे कौलांतक पीठाचे प्रमुख आहेत. इशपुत्र यांच्या योग आणि भक्ती पद्धतींचा प्रचार करणारे अनुयायी हे आठ पेक्षा जास्त देशांमध्ये स्थित आहेत.
Video: दिवसभरात ६ तास सराव, बर्फात ध्यान करणारे योगी पुरुष
हे ही वाचा<< Video: महिलेवर ऑन कॅमेरा हल्ला, गुंडाने जमिनीवर आदळलं.. नेटकऱ्यांचा संताप, संदेशखालीचा संबंध आहे का?
हा व्हिडिओ, जरी अनेकांना आश्चर्यचकित करणारा असला तरी, लहानपणापासून योगास समर्पित असलेल्या इशपुत्र यांच्या योगिक पद्धतींची ही केवळ एक झलक आहे. हिमवर्षावाच्यादरम्यान योगा करण्यासाठी कठोर प्रशिक्षण आवश्यक आहे आणि या व्हिडिओमधून सत्येंद्रनाथ यांचा कठोर अभ्यास पाहायला मिळतो. हा व्हिडिओ या वर्षी फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात इशपुत्र यांचा शिष्य राहुल याने रेकॉर्ड केला होता, जो येणाऱ्या पिढ्यांना शिक्षित करण्यासाठी सत्येंद्र नाथ यांच्या योगाभ्यास आणि ध्यानाची दृश्ये सोशल मीडियावर शेअर करत असतो.