भारत हा सुजलाम् सुफलाम् देश आहे. येथे दूधाच्या नदी वाहतात, जमीन फळा फुलांनी बहरलेली असते. पण याच देशांत दुर्देवाने करोडो लोक उपाशी झोपतात. एकवेळचं पोटभर अन्नही त्यांना मिळत नाही. खायला कोंडा आणि निजेला धोंडा अशी गत आहे. पण दुसरीकडे ज्यांना कसलीही कमतरता नाही त्यांच्या घरी मात्र अन्नाची नासाडी होत आहे. अन्न वाया जात आहे. किती विसंगती या दोन्ही परिस्थितीत आहे. पण खरंच आजही काही चांगली लोक या जगात आहेत जी या गरिबांसाठी जीवाचे रान करत आहेत. असाच आहे २३ वर्षांचा एक तरूण निदान आपल्या शहरातील गरिब उपाशी पोटी निजू नये एवढाच त्याचा हेतू. म्हणून अन्न वाया घालवू नका अशी विनंती तो करत आहे. ज्यांच्याकडे अन्न आहे त्यांच्याकडून ताजे अन्न गोळा करून तो गरिबांचे पोट भरत आहेत.
वाचा : ‘टायटॅनिक’ हिमनगावर आदळून बुडाले नव्हते
वाचा : भारतातल्या १% गर्भश्रीमंतांकडे देशातली ५८% संपत्ती..
पद्मनाभन तेवीस वर्षांचा तरूण. त्याचे कौतुक करावे तेवढे कमी आहे. कारण ज्या वयात त्याच्या सोबतची मुले मजा मस्ती करतात त्या वयात एका चांगल्या कामासाठी तो हातभार लावत आहे. आपल्या शहरातील कोणतीही गरिब व्यक्ती उपाशी राहू नये यासाठी तो धडपडत आहे. म्हणूनच चैन्नईतल्या प्रत्येक गरिबासाठी तो देवदूतापेक्षा कमी नाही. इथल्या हॉटेलमधून उरलेले ताजे अन्न तो घेतो आणि शहरातील गरिबांना देतो. हॉटेलमध्ये दरदिवशी ताजे अन्ने तयार केले जाते पण नंतर मात्र हे अन्न वाया जाते. हे अन्न फेकून दिले जाते. हे जेव्हा पद्मनाभन याला कळलं तेव्हा अन्न वाया जाऊ नये तसेच गरिबांना अन्न मिळावे यासाठी यांने एक मोहिम सुरू केली. शहरातील अनेक हॉटेलमधून पद्मनाभन अन्न गोळा करतो आणि येथील गरिबांना तो अन्न देतो. त्याने एक स्वयंसेवी संस्थाही स्थापन केली आहे. गेल्या कित्येक वर्षांपासून भुकेलेल्यांचे पोट भरण्याचे काम तो करतो.