रायचूर येथील एका गर्भवती महिलेने चार पाय असलेल्या एका मुलाला जन्म दिला आहे. आतापर्यंत डोके, पाठ चिकटलेली जुळी मुलं अनेकदा पाहिली असतील पण चार पाय असलेले मुल जन्माला येणे दुर्मिळच. रायचूर येथील २३ वर्षीय महिलेने शनिवारी येथील स्थानिक रुग्णालयात या मुलाला जन्म दिला असून त्याला सध्या अतिदक्षता विभागात ठेवण्यात आले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

Viral Video : केवळ कुत्र्याला वाचवण्यासाठी मोटारमनने केली धडपड

रायचूर येथील पुलदिनी गावातील रहिवाशी असलेल्या २३ वर्षीय लालिताम्मा हिने चार पाय असलेल्या मुलाला जन्म दिला आहे. या मुलाला सध्या अतिदक्षता विभागात ठेवण्यात आले आहे. चार पाय असलेलं मुलं क्वचितच पाहायला मिळालं असल्याने त्याची डॉक्टरांकडूनही विशेष काळजी घेतली जात आहे. या मुलाची प्रकृती उत्तम असली तरी आता शस्त्रक्रियेद्वाचे त्याचे दोन पाय वेगळे करता येतील का यावर डॉक्टर विचार करत आहेत. टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार शनिवारी संध्याकाळी या महिलेने मुलाला जन्म दिला. या मुलाला आपण दैवी देणगी असल्याचे मानतो असेही लालिताम्माने सांगितले. त्यामुळे त्याला असेच वाढवण्याची तयारी तिने दर्शवली असल्याचेही या वृत्तपत्राला सांगितले. लालिताम्मा हिला आणखी एक मुलगा आहे. तीन वर्षानंतर तिला हे दुसरे मुल झाले. चार पायाचे मुल जन्माला येणे हे दैवी चमत्कार असल्याचे तिने सांगितले. तसेच त्याच्यावर शस्त्रक्रिया न करता त्याचे  संगोपन करण्याची तयारी तिने दर्शवली आहे. या मुलाची शस्त्रक्रिया करण्यासाठी आपल्याजवळ पैसे नाहीत अशीही खंतही तिने बोलून दाखवली.

VIRAL VIDEO: माकडाच्या पिल्लाला करायची होती चिमुकल्यासोबत गट्टी