पावसाळा सुरु होताच पर्यटकांना धबधब्यांना जाण्यासाठी गर्दी होत असते. पावसाळी पर्यटनाला जाण्याचा अनुभव प्रत्येकासाठी ‘रिफ्रेशिंग’ ठरतो. त्यामुळे पहिला पाऊस पडला की लोकांचे पावसाळी सहलींचे नियोजन सुरू होते. दुर्दैवाने या वाढत्या पर्यटनाबरोबरच निसर्गरम्य ठिकाणी झालेल्या अपघातांच्या घटनाही पुढे येतात. त्यामुळं आपण खबरदारी घ्यायला हवी. पाणी हे जीवन आहे हे तर आपल्याला माहितच आहे. पण, जर पाण्याशी खेळ केला तर तो विनाशही करु शकतो. पाण्याच्या ठिकाणी जाताना काळजी घ्या, असं वारंवार सांगूनही अनेकजण या सूचनेकडे दुर्लक्ष करतात आणि मग त्यांच्यासोबत अघटित घडतं. असाच एक व्हिडिओ सध्या समोर आला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

सध्या समोर आलेला व्हिडीओ बघून तुमच्याही काळजाचा ठोका चुकेल,  हा व्हिडिओ कर्नाटकातील कोल्लूरजवळील अरसीनागुंडी धबधब्याचा असल्याचं सांगण्यात येत आहे. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, या धबाधब्यातून मोठ्या प्रमाणात पाणी पडत आहे, यावेळी धबधब्याच्या बाजूला असलेल्या एका दगडावर हा तरुण उभा आहे. तो या धबधब्याच्या बाजूला रिल शूट करत आहे, यावेळी तो हालचाल करताना अचानक त्याचा पाय घसरतो आणि तो जोरात त्या दगावर पडतो. हे सगळे त्याचा मित्र मोबाईलमध्ये शूट करत अशतो. तरुण पडताच त्याचा मित्र त्याच्याडे धाव घेतो. यानंतर या तरुणाचं काय झालं याची अद्याप माहिती मिळू शकलेली नाही.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा – VIDEO: “हे मणिपूर नाही” छेड काढणाऱ्याची अर्धनग्न अवस्थेत काढली धिंड; उत्तर प्रदेशात महिलेच्या धाडसाचं होतंय कौतुक

आग, हवा आणि पाण्याशी कधीही खेळू नये कारण ते जीवघेणं ठरू शकतं असं म्हणतात. कधी व्हिडिओ तर कधी सेल्फीच्या नादात अनेक वेळा लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. हा व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल होत असून तरुणांनी यातून धडा घेणे गरजेचे आहे.