देशभरात दहीहंडीचा सण मोठ्या उत्साहात साजरा केला गेला. पण, मुंबईत यावेळी दहीहंडीची जास्त धमाल पाहायला मिळाली. मात्र, सोमवारी शहरात दहीहंडीशी संबंधित पहिल्या मृत्यूची नोंद झाली आहे. त्यानंतर पोलिसांनी कार्यक्रमाच्या आयोजकांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. एका अधिकाऱ्याने मंगळवारी याबाबत माहिती दिली. दहीहंडी स्पर्धेदरम्यान २४ वर्षीय गोविंदा संदेश दळवी याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याची घटना विलेपार्ले पोलीस ठाण्यात नोंदवण्यात आली होती. या तरुणाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये गोविंदाचे पथक दहीहंडी फोडण्यासाठी थर रचताना पाहायला मिळत आहे. एकावर एक थर रचत ते हंडी फोडण्यात यशस्वी होतात, पण यादरम्यान हंडी फोडणाऱ्या एकाचा तोल सुटतो आणि तो तरुण जोरात खाली पडतो.

( हे ही वाचा: Viral Video: झोमॅटो डिलिव्हरी बॉयला महिलेने केली चप्पलेने मारहाण; व्हिडीओ झाला व्हायरल)

दहीहंडीचा व्हिडीओ येथे पहा

( हे ही वाचा: शांत ज्वालामुखीमध्ये दगड फेकून माणसाने केली चूक; त्यानंतर झालेल्या उद्रेकाचा पहा हा भीतीदायक व्हिडीओ)

@TaloraMaahi नावाच्या अकाऊंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला असून बहुतांश लोक त्यावर कमेंट करत आहेत आणि आपापल्या प्रतिक्रिया देत आहेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार, संदेश दळवीच्या मृत्यूनंतर, अधिकाऱ्यांनी सांगितले की, पोलिसांनी एफआयआरमध्ये भारतीय दंड संहितेच्या (IPC) कलम ३०४-अ (निष्काळजीपणामुळे मृत्यू) आणि ३३८ जोडले आहे. या घटनेप्रकरणी अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नसून याप्रकरणी अधिक तपास सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 24 year dahihandi participant falls to dealth in mumbai a shocking incident clip goes viral gps
Show comments