काही लोकांना खाण्याची खूप आवड असते. अन्न मिळविण्यासाठी ते कोणत्याही थराला जायला तयार असतात. खाल्ल्यानंतरही पुन्हा ते अनेक पदार्थ खाण्यास लाजत नाहीत; परंतु काही वेळा असे करणे धोकादायक ठरते. असाच काहीसा प्रकार एका २४ वर्षीय महिलेसोबत घडला आहे. खरं तर, ही महिला ‘मुकबंग’मध्ये म्हणजेच प्रेक्षकांच्या आनंदासाठी मोठ्या प्रमाणात अन्न खाण्यात पारंगत होती. परंतु, अलीकडेच अचानक तिचा मृत्यू झाला. आश्चर्याची गोष्ट म्हणजे ती त्यावेळी लाइव्ह स्ट्रीमिंग करीत होती.

ऑडिटी सेंट्रल नावाच्या वेबसाइटच्या रिपोर्टनुसार, चीनने २०२० मध्ये मुकबंग स्ट्रीम आणि व्हिडीओंवर कारवाई केली होती. या कारवाईमध्ये असे करणाऱ्यांना १० हजार युआन म्हणजेच सुमारे एक लाख १७ हजार रुपयांपर्यंत दंड आकारला जाऊ शकतो. तथापि, असे असूनही चीनसह अनेक आशियाई देशांमध्ये ‘मुकबंग स्ट्रीम’ अजूनही खूप लोकप्रिय आहे. त्यामध्ये हजारो लोक आपला जीव धोक्यात घालून खूप अन्न खातात. अशा लोकांमध्ये पॅन शिओटिंगदेखील होते. तिने प्रथम वेट्रेस म्हणून काम केले आणि नंतर ती व्यावसायिक मुकबंगर बनली.

nashik nylon manja loksatta news
नाशिकमध्ये एक लाखाचा नायलाॅन मांजा जप्त
women naga sadhu life
कसे असते महिला नागा साधूंचे जीवन? त्यांचा पेहराव…
Neena Gupta aunt threw her out after daughter Masaba birth
लग्न न करता झालेली आई, एकदा काकूने अचानक मध्यरात्री…; बॉलीवूड अभिनेत्रीने सांगितला ‘तो’ प्रसंग, म्हणाली…
Important tips to help prevent car theft
‘या’ छोट्या टिप्स फॉलो केल्यास चोर तुमची कार कधीही चोरणार नाही
Sheeba says Sunil Dutt made her method actress
“त्यांनी मला एका कोपऱ्यात बसून रडायला सांगितलं, कोणालाच…”; प्रसिद्ध अभिनेत्रीने सांगितला सुनील दत्त यांच्याबरोबर काम करण्याची आठवण
Girl's Hair Cut case At Dadar Station
“म्हणून मी तिचे केस कापले…”, दादर स्थानकात तरुणीचे केस कापणाऱ्या आरोपीचा धक्कादायक खुलासा
sonu sood on income tax raid
सोनू सूद आयकर विभागाने घरावर केलेल्या छापेमारीबद्दल झाला व्यक्त; म्हणाला, “माझ्या घरातील कपाटं आणि दरवाजांना…”
Raveena Tandon daughter Rasha Thadani Uyi Amma In Azaad watch video
Video: रवीना टंडनच्या १९ वर्षीय मुलीचं Uyi Amma गाणं प्रदर्शित; राशाच्या जबरदस्त डान्सने वेधलं लक्ष, नेटकरी म्हणाले, “आईचं नाव…”

मात्र, जास्त खाण्याच्या सवयीमुळे तिचा जीव गेला. अतिरिक्त अन्न शरीराला सहन होत नव्हते आणि त्यामुळेच लाइव्ह स्ट्रीमदरम्यान तिला आपला जीव गमवावा लागला. शवविच्छेदनात तिचे पोट न पचलेल्या अन्नाने भरले असल्यामुळे तिचे पोट खराब झाल्याचे उघड झाले. ही घटना चीनमधील असून, पॅन शिओटिंग असे या चिनी महिलेचे नाव आहे.

(हे ही वाचा : Video: लहानशा मुलानं आगीला हलक्यात घेऊन केली ही चूक; जीवघेण्या संकटामुळे आयुष्यभराची अद्दल, पाहा नेमकं काय घडलं )

रिपोर्ट्सनुसार, प्रोफेशनल मुकबंगर बनण्याची कल्पना त्या महिलेच्या मनात आली जेव्हा तिने इतर यशस्वी मुकबंग स्ट्रीमर्सना भरपूर अन्न खातानाचे व्हिडीओ बनवून आणि त्यांच्या चाहत्यांकडून भेटवस्तू मिळवून भरपूर पैसे कमावताना पाहिले. त्यानंतर तिनेही तसे प्रयत्न करण्याचे ठरवले. सुरुवातीला, पॅनला जास्त अन्न खाण्यात आणि फॉलोअर्स मिळवण्यात खूप अडचणी आल्या; पण नंतर तिला त्यात यश मिळू लागले. मात्र, तिच्या खाण्याच्या व्यसनामुळे तिचे वजन नंतर ३०० किलोपर्यंत वाढले. त्यानंतर तिला रुग्णालयात दाखल करावे लागले.

प्रत्येक स्ट्रीमिंगदरम्यान १० किलो खायची अन्न

ऑडिटी सेंट्रलच्या अहवालानुसार, पॅन दिवसातून किमान १० तास सतत खात असे आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे ती प्रत्येक स्ट्रीमिंग सत्रात १० किलोग्रॅमपेक्षा जास्त अन्न खात असे. अशा प्रकारे अतिअन्न सेवनाच्या सवयीमुळे होणाऱ्या दुष्परिणामांच्या कारणास्तव तिचा मृत्यू झाला असावा. तिचा मृत्यू कसा झाला याबाबत कोणतेही जाहीर वक्तव्य जारी करण्यात आलेले नसले तरी शवविच्छेदनादरम्यान तिच्या शरीराची तपासणी केली असता, तिच्या पोटात बरेच अन्न आढळले; जे तिला पचत नव्हते.

Story img Loader